Tarun Bharat

‘तुतारी’, ‘राजधानी’ ने जाताय तर 1 तास आधी स्थानकात रहा हजर

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कोकण रेल्वेच्या मार्गावर  पुन्हा तुतारी आणि राजधानी या दोन गाडय़ा धावणार असल्याची घोषणा झालेय. पण या गाडय़ातून प्रवास करणाऱया प्रवाश्यांना रेल्वेच्या निर्धारित वेळेआधी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे प्रत्येक प्रवाश्याची ट्रेन मध्ये प्रवेश करण्यापूर्वी तपासणी करणार आहे.

 कोकण रेल्वेच्या मार्गावर 26 सप्टेंबर पासून तुतारी तर 2 ऑक्टोबर पासून राजधानी या दोन गाडय़ा धावणार आहेत. या ट्रेन मधून प्रवास करणाऱया प्रत्येक प्रवाश्याची ट्रेन मध्ये चढण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक प्रवाश्याच तापमान तपासून मगच ट्रेन मध्ये प्रवेश दिला जाणार आहे. शासनाच्या निर्धारित तापमानापेक्षा अधिक तापमान आढळल्यास त्या व्यक्तीला ट्रेन ने प्रवास करता येणार नाही.

  प्रवाश्यांची संख्या लक्षात घेता प्रवाश्यांची किमान एक तास आधी रेल्वे स्थानकात उपस्थित रहावे असे आवाहन कोकण रेल्वे ने केले आहे.त्याच बरोबर स्थानाक परिसरात वावरताना प्रवाश्यांची परस्परात सुरक्षित अंतर ठेवून वावरायचे आहे .आयत्या वेळी येणाया प्रवाश्यांसाठी हि सूचना महत्वाची आहे तपासणी पूर्ण झाल्यावरच त्यांना ट्रेन मध्ये प्रवेश मिळणार आहे.

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून ही सगळी पाऊले  कोकण रेल्वे कडून उचलली जात आहेत. यामुळे तुम्ही जर कोकण रेल्वे ने प्रवास करत असाल तर तुम्हाला तुमच्या  निर्धारित वेळेच्या आधी  किमान एक तास रेल्वे स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे.

Related Stories

रत्नागिरीत 163 ग्रामपंचायत निवडणूक मतदानाचा रणसंग्राम,राजकीय पक्षांची प्रतिष्ठा लागलीय पणाला

Archana Banage

पन्नास वर्षांवरील वृक्ष ठरणार ‘हेरिटेज ट्री’

NIKHIL_N

नम्रता सावंत कोकण बोर्डात एमसिव्हीसी डेव्हलपमेंट मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम

Anuja Kudatarkar

‘तो’ पाणी निचऱयाचा प्रश्न लवकरच सुटणार

NIKHIL_N

फुस लावून पळवलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांकडून सुटका

Patil_p

बांद्यात एकमूठ धान्य गरिबांसाठी उपक्रम

NIKHIL_N