Tarun Bharat

तुप विकण्याच्या बहाण्याने ३३ हजारांचे दागिने लांबविले

Advertisements

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

तूप विकण्याचा बहाना करुन महिलेच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाचे ३३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात दोन चोरट्यांनी लांबविले. ही घटना दि. ८ रोजी सकाळी १० वा. सुमारास येथील जैन मंदिर परिसरात घडली. प्रमिला विलास पाठक यांनी कुर्डुवाडी पोलिसांत याची फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की अज्ञात दोन इसमांनी घराबाहेर येऊन आम्ही शेंद्रीचे आहोत. तुमच्या मुलाने तूप पाठवले आहे . ते घेण्यासाठी या असा आवाज आल्याने फिर्यादी तुपासाठी भांडे घेऊन बाहेर आल्या. तूप घेतल्यानंतर त्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील गंठण खूप छान आहे.माझ्या भावाचे लग्न आहे. तुमच्या दुकानातूनच आम्हाला गंठण करायचे आहे.तरी तुमच्या गळ्यातील गंठण काढून दाखवा. त्यावेळी फिर्यादीने ते गंठण काढून दिले व तुपाचे पैसे आणण्याकरीता घरात जाऊन बाहेर येईतोपर्यंत त्या अज्ञात दोन चोरट्यांनी गंठण घेऊन पलायन केले. प्रमिला पाठक यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

सोलापूर शहरात 68 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकाचा मृत्यू

Archana Banage

राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचा तीव्र निषेध

Archana Banage

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णांचा आलेख चढता

Archana Banage

अनैतिक संबंधातून झालेल्या खुनात दोघांना जन्मठेप

Archana Banage

वेळेचा सदुपयोग करत सुर्याचीवाडी येथील जाधव कुटुंबीयांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

Archana Banage

पुण्यात पायलटची 16 लाखांची फसवणूक

datta jadhav
error: Content is protected !!