Tarun Bharat

तुमकूरच्या सिरा मतदारसंघातून डॉ. राजेश गौडा यांना तिकीट

बेंगळूर :

राज्यातील सिरा आणि राजाजीनगर विधानसभा मतदारसंघांसाठी 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून विजयाची हमी असणारा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यासाठी प्रयत्न चालले आहेत. दरम्यान, तुमकूर जिल्हय़ाच्या सिरा मतदारसंघातून माजी खासदार सी. पी. मुडलगिरीयप्पा यांचे पुत्र डॉ. राजेश गौडा यांना भाजपकडून तिकीट मिळणार आहे. त्यांनी शनिवारी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. बेंगळूरमधील प्रदेश भाजप कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्या उपस्थितीत डॉ. राजेश गौडा यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी पक्षाचा ध्वज देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. पेशाने डॉक्टर असणारे राजेश गौडा यांना सिरा मतदारसंघातून तिकीट देण्याचा निर्णय अलिकडे झालेल्या राज्य भाजप कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला होता. राजेश यांच्या नावाची शिफारसही हायकमांडकडे करण्यात आली आहे. विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची खात्री झाल्यानंतर डॉ. राजेश गौडा यांनी भाजपप्रवेशाचा निर्णय घेतला. कमी खर्चात गरिबांवर उपचार करीत असल्याने त्यांची लोकप्रिय डॉक्टर म्हणून ओळख आहे. त्यामुळे भाजपने त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

शिवमोगा स्फोटः खाण मालक, डायनामाईट पुरवठा करणारी व्यक्ती अटकेत : गृहमंत्री

Archana Banage

प्रक्षोभक भाषणप्रकरणी टिकैत यांच्याविरुद्ध एफआयआर

Amit Kulkarni

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच

Archana Banage

कर्नाटकातील काही जिल्ह्यात मध्यम, मुसळधार पावसाची शक्यता

Archana Banage

कर्नाटक : जलद चाचण्यांची संख्या वाढणार

Archana Banage

डिसेंबर अखेरपर्यंत सर्वांना लस देणार

Amit Kulkarni