Tarun Bharat

‘तुमचा भुजबळ करू’ म्हणणाऱ्यांना कोर्टाने उत्तर दिलं : मंत्री भुजबळ

मुंबई/प्रतिनिधी

महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. भुजबळांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान याआधीच एसीबीने याच महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील पाच आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. यावर मंत्री छगन भुजबळ यांनाही वारंवार ‘तुमचा भुजबळ करू’ म्हणणाऱ्यांना कोर्टाने उत्तर दिलं असंही त्यांनी म्हंटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त झाले आहेत. या प्रकरणातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा सर्वात मोठा निर्णय दिला. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दोन वर्षांची जेलवारी झाली होती.

Related Stories

गुजरात : गोडाउनमध्ये स्फोट; चार जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी पार

datta jadhav

सारथीसाठी मराठा महासंघाचे सोमवरी आंदोलन

Abhijeet Khandekar

‘स्पुतनिक लाइट’ उतरणार मैदानात

datta jadhav

शेतकरी आंदोलन मुद्द्यावर राहुल गांधी यांचे ट्विट; म्हणाले …

Tousif Mujawar

साताऱ्यातील फेरीवाल्यांना पालिका देणार 1000 रुपये : खा. उदयनराजे

datta jadhav