Tarun Bharat

तुरुंगात डांबले तरी उद्धव ठाकरेंसोबत राहणार

लाचलुचपत’च्या नोटीसनंतर आमदार राजन साळवींचा घणाघात

प्रतिनिधी/ रत्नागिरी  

राज्यात विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र सत्ताधाऱयांकडून राबवले जात आह़े त्याचाच एक भाग म्हणून रायगड येथील लाचलुचपत विभागाने आपणाला नोटीस बजावल़ी हिम्मत असेल तर माझ्यावर कारवाई करून अटक करून दाखवावी, असे आव्हान देत सत्ताधाऱयांकडून जरी आपल्याला तुरूंगात डांबण्यात आले तरी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक राहिन, असा घणाघात ठाकरे गटातील राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी केल़ा

 लाचलुचपत विभागाकडून आलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवी यांनी शहरातील शिवसेना मुख्य कार्यालय येथे रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेतल़ी यावेळी साळवी यांनी सांगितले की, उत्पन्न, खर्च व मालमत्ता या अनुषंगाने जबाब नोंदवण्यासाठी आपल्याला नोटीस बजावण्यात आली आह़े बाळासाहेब ठाकरे यांनी पाठीवर मारलेली थाप व शिवसैनिक हीच माझी संपत्ती आह़े मी निर्दोष व स्वच्छ आहे. त्यामुळे अशा धमक्यांना मी भिक घालत नाह़ी जनताही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आह़े

 राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर मी निष्ठावंत राहिलो. मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. नारायण राणे शिवसेना सोडून गेले, तेव्हाही मी शिवसेनेसोबतच राहिल़ो ज्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ताचा असल्याचा आरोप होतात़ ते नंतर भाजपात जावून स्वच्छ होत आहेत़ नोटीस पाठवण्याइतके माझ्याकडे कोणते घबाड आहे, हाच प्रश्न मला पडला आह़े मला 15 दिवसांची मुदत द्या, अशी मागणी लाचलुचपत विभागाकडे केल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितल़े

  प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला म्हणून राजन साळवी हे शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आह़े मी कट्टर शिवसैनिक असून उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाह़ी रिफायनरी प्रकल्पाबाबत आपण स्थानिक जनतेच्या पाठीशी आहोत़ मला स्वकियांचा, पक्षातील कोणत्याही व्यक्तीचा त्रास नाही. नुकतीच आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून त्यांना आपल्या भूमिकेविषयी सर्व माहिती दिली आह़े  

                 राज्यपालांना हुसकावून लावण्याची गरज

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आह़े त्यांचा अवमान केलेला सहन केला जाणार नाह़ी महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात येत आह़े शिवरायांचा अवमान करणाऱया राज्यपालांना हुसकावून लावण्याची गरज आहे, असे आमदार राजन साळवी यांनी यावेळी सांगितल़े

Related Stories

आंबा-काजू बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी चमणकर

Anuja Kudatarkar

गुहागरातही कोटय़वधीची व्हेलची उलटी जप्त

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा 10 वा बळी, बाधितांची संख्या 297 वर

Archana Banage

देवगड शिक्षण विभागात करोडोची अफरातफर

NIKHIL_N

कळणे मायनिंगचा ‘बांध’ फुटला

NIKHIL_N

पत्नीच्या निधनानंतर अवघ्या एका दिवसातच पतीचे निधन

Anuja Kudatarkar