Tarun Bharat

तुर्कस्तान-फ्रान्स यांच्यात व्यंगचित्रयुद्ध

Advertisements

चार्ली हेब्दोने तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांना दाखविले अर्धनग्न

वृत्तसंस्था / इस्तंबूल, पॅरिस

काही वर्षांपूर्वी दहशतवादी हल्ल्याला तोंड दिलेले फ्रान्समधील साप्ताहिक चार्ली हेब्दो पुन्हा एकदा वादात सापडले आहे. साप्ताहिकाने तुर्कस्तानचे अध्यक्षांचे काढलेले व्यंगचित्र वादाचे कारण ठरले आहे. तुर्कस्तानने हेब्दोच्या विरोधात ‘सांस्कृतिक वंशभेदा’चा आरोप केला आहे. चार्ली हेब्दोने अलिकडेच स्वतःच्या मुखपृष्ठावर तुर्कस्तानचे अध्यक्ष रजब तैयब एर्दोगान यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते.

एर्दोगान यांचे माध्यम अधिकारी फार फाहरेतीन आल्तुन यांनी ट्विट करत प्रकाशकाकडून सांस्कृतिक वंशभेद आणि द्वेष फैलावण्याच्या अत्यंत घृणास्पद प्रयत्नाची निंदा करत असल्याचे म्हटले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुस्लीमविरोधी धोरणाचा परिणाम दिसून येत असल्याचे आल्तुन यांनी म्हटले आहे.

फनी एर्दोगान

हेब्दोची बुधवारी अतिरिक्त ऑनलाईन आवृत्ती प्रसिद्ध झाली होती. यात एर्दोगान हे टी-शर्ट आणि अंडरपँटमध्ये दर्शविण्यात आले असून ते कॅनने बियर पित असल्याचे एका महिलेचा स्कर्ट उचलत असल्याचे व्यंगचित्रात दाखविण्यात आले आहे. ‘एर्दोगान : खासगी आयुष्यात अत्यंत मजेशीर आहेत’ अशी ओळही व्यंगचित्राला जोडण्यात आली आहे. फ्रान्सच्या शिक्षकाच्या हत्येनंतर एर्दोगान, मॅक्रॉन आणि अन्य युरोपीय नेत्यांदरम्यान वाप्युद्ध सुरू असताना हेब्दोने हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे.

धर्मनिरपेक्षता कायम

फ्रान्स स्वतःच्या धर्मनिरपेक्ष परंपरा आणि कायद्यांचे पालन करत राहणार असून यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य निश्चित करण्यात आले आहे, असे उद्गार मॅक्रॉन यांनी काढले आहेत. तर मॅक्रॉन यांचा विरोध केवळ तुर्कस्तानच नव्हे तर इराणमध्येही होत आहे. मॅक्रॉन यांच्या विधानानंतर तेथील प्रसारमाध्यमांनी त्यांना राक्षसाच्या स्वरुपात दर्शविले आहे. तर बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका इस्लामिक समुहाच्या सुमारे 10 हजार सदस्यांनी फ्रान्सच्या विरोधात निदर्शने केली आहेत.

Related Stories

भिंतीत छिद्र पाडून बाहेर काढतात मृतदेह

Patil_p

जगातील सर्वात उंच ऑब्जर्व्हेशन व्हील दुबईत

Patil_p

काही हिंदू-शीख सुरक्षित स्थळी

Patil_p

स्वीडन पंतप्रधानपदी मॅग्डेलेना अँडरसन

Patil_p

अंदाधुंद गोळीबारात अमेरिकेत सहा ठार

Patil_p

पाकिस्तान : 26/11 हल्ल्याच्या सूत्रधाराला अटक

datta jadhav
error: Content is protected !!