Tarun Bharat

तुर्की : जगप्रसिद्ध हागिया सोफिया संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर

ऑनलाईन टीम / इस्तांबुल : 

तुर्कीतील जगप्रसिद्ध असलेल्या हागिया सोफिया संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यीप इरदोगोन यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

ख्रिश्चिन बायझंटाईन साम्राज्यात निर्मिती झालेल्या हागिया सोफिया संग्रहालयाचा यूनेस्कोच्या जागतिक वारसांच्या यादीत समावेश होतो. ऑटोमनांच्या काँस्ट्यनटीनोपलच्या विजयानंतर 1453 साली या संग्रहालयाचे रुपांतर मशिदमध्ये करण्यात आले होते. तुर्कीच्या न्यायालयाने आता कॅबिनेटचा निर्णय रद्द करुन बायझंटाईन स्मारकाचा संग्रहालय म्हणून असलेला दर्जा रद्द केला. त्यानंतर या संग्रहालयाचा मशिदीत रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर इरदोगोन यांनी हे संग्रहालय मुस्लीम बांधवांसाठी खुले केले.

इरदोगोन यांच्या या निर्णयामुळे खिश्चन लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या निर्णयाविरोधात टीकेची झोड उठली आहे. युरोप, ग्रीस आणि तुर्कीचा मित्र रशिया या निर्णयामुळे नाराज आहे. लाखो ख्रिश्चनांचा आवाज ऐकला गेला नाही, तसेच तुर्कीचा निर्णय जगाला भडकवण्याचा प्रयत्न आहे, असेही या देशांनी म्हटले आहे.

Related Stories

पॅरालिम्पिकमध्ये नोएडाच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘रौप्य’

datta jadhav

एअर इंडियाचा देशांतर्गत प्रवास 4 मे पासून सुरू

prashant_c

गॅस सिलिंडर दरात 10 रुपयांनी कपात

Patil_p

कोरोनाची दुसरी लाट : उच्चांकी रुग्ण वाढीमुळे केंद्राने घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar

उत्तराखंड महाप्रलय : 26 मृतदेह हाती, अजूनही 171 जण बेपत्ता

datta jadhav

बेंगळूरमध्ये दिसलं सूर्याचं प्रभामंडळ

datta jadhav