Tarun Bharat

‘तुलसीदास जुनियर’चा ट्रेलर प्रदर्शित

Advertisements

4 मार्चला संजय दत्तचा चित्रपट झळकणार

बहुप्रतीक्षित चित्रपट ‘तुलसीदास जुनियर’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात दिगवंत अभिनेता राजीव कपूर दिसून येणार आहे. तसेच चित्रपटात संजय दत्त आणि बालकलाकार वरुण बुद्धदेव देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तुलसीदास ज्युनियर हा चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. राजीव यांनी यात स्नूकरपटूची भूमिका साकारली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मृदुल यांनी पेलली आहे. तर टी-सीरिज आणि आशुतोष गोवारिकर यांची या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हा चित्रपट स्नूकर या खेळावर आधारित असून याची कहाणी एका 13 वर्षीय मुलाच्या अवतीभोवती घुटमळणारी आहे. या मुलाला स्नूकरच्या खेळात स्वतःच्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढायचा असतो. राजीव कपूर यांनी यात तुलसीदास ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ट्रेलरमध्ये संजय दत्त आणि वरुण यांची मजेशीर बॉन्डिंग दिसून येते. अभिनेता राजीव कपूर यांचे निधन झाल्यावर चाहत्यांना त्यांना मोठय़ा पडद्यावर पाहण्याची ही अखेरची संधी आहे. राजीव कपूर हे अभिनेता राज कपूरचे सर्वात कनिष्ठ बंधू आणि रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांचे बंधू हेते. राजीव कपूर यांचे मागील वर्षी 9 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते.

Related Stories

जॅकलीन फर्नांडिसला मोठा दिलासा! २०० कोटींच्या घोटाळाप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर

Archana Banage

कादंबरीची भूमिका कलाकार म्हणून प्रभल्भ करणारी : पूजा बिरारी

Patil_p

‘फुलपाखरू’ आणि ‘लव्ह लग्न लोचा’च्या बरोबरीने ‘झी युवा’ घेऊन येणार ‘कॉमेडी रस्सा’

Archana Banage

जॅकलीन फर्नांडिसची हॉलिवूडवारी

Patil_p

अंगिरा झळकणार आंतराष्ट्रीय चित्रपटात….

tarunbharat

क्रिमिनल जस्टिसचा तिसरा सीझन लवकरच

Amit Kulkarni
error: Content is protected !!