Tarun Bharat

तूंतें नमितों श्रीभगवंता

Advertisements

महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात-

परमविनीत नियतेन्दयि । अंजलिबद्ध करद्वय ।

श्रीकृष्णातें स्तविता होय । तें श्लोकचतुष्टय शुक वर्णी । रौद्रज्वर श्रीकृष्णातें । तावूं गेला स्वसामर्थ्यें। तंव नारायणज्वरें त्यातें । संतापातें पावविलें ।मग तो त्रिपाद त्रिशिरा ज्वर । करिता झाला दीर्घ विचार।  म्हणे श्रीकृष्ण परमेश्वर । आत्मा सर्वत्र सदोदित। श्रीकृष्ण चिन्मात्र वस्तु एक । येर अवस्तु विवर्त अशेष ।  संकल्पजनित त्रिगुणात्मक। दृश्य मायिक जडभ्रांति । त्यामाजी तमोगुणात्मा रुद्र । तज्जनित मी त्रिशिरा ज्वर ।  माझी शक्ति किमन्मात्र। कृष्ण स्वतंत्र परमात्मा । कृष्णास्तिक्मयें जग आभासे। कृष्णप्रकाशें संव्त विलसे । कृष्णानंदें वेधकदशे। विषयीं भासे आनंद । त्या कृष्णातें संतापपीडा । करितां तापलों मीचि रोकडा । त्यालागीं कृष्णप्रताप गाढा । नये परिपाडा गौण तया । ऐसें विवरूनि अंतःकरणीं । निर्भय स्थान कृष्णचरणीं ।  ज्वरें माहेश्वरें लक्षूनी । नमनीं स्तवनीं प्रवर्तला । अति न्त्यानंतशक्तिमंता । तूंतें नमितों श्रीभगवंता।  सगुण होसी सुरकार्यार्था । परेशा परता परेश तूं। ब्रह्मादि गुणत्रयांच्या मूर्ति । परेश ऐसें त्यांस म्हणती ।  त्यांची ही जे ईशनशक्ति। तिची प्रवृत्ति तव सत्ता । येथ म्हणसी हेतु काय । तरी सर्वात्मा तूं सर्वमय ।  चराचर चेतयिता चिन्मय । स्फुट आम्नाय प्रकाशिती। तेंही कैसें घडेल म्हणसी। तरी या विवर्तविश्वाभासीं । केवळ ज्ञप्तिमात्र तूं होसी। चैतन्यघन शुद्धात्मा । तेंचि सर्वत्र चेतयितार । तो तूं परिपूर्ण परमेश्वर ।  विश्वसृजनावनाप्ययकर । हेतु साचार सर्वांचा । ऐसें ब्रह्म निर्गुण म्हणसी । मे तंव जन्मलों देवकीकुशी।  तरी हें सहसा हृषीकेशी। प्राकृतासी न चाळवीं । इत्यादि ईशनसामर्थ्यवंत। तत्ब्रह्म या पदें प्रस्तुत ।  केला श्रुतींहीं सिद्धान्त। इत्थंभूत परेशा । म्हणसी ब्रह्म तें कैसें काय । तरी ब्रह्म वेदाचें नामधेय ।  वेदप्रतिपाद्य निरामय । जें अमळ अद्वय अविनाश । तया अविनाशत्वा हेतु। सर्व विक्रियारहित प्रशान्त ।  यालागीं नेति मुखें सिद्धान्त। करूनि मौनस्थ श्रुति झाल्या।सविशेष आणि निर्विशेष । अप्रशान्त आणि प्रशान्त।  अक्रिय आनि क्रियावंत । तूं या हेतु दोहींचा। जेथवरी सविशेष वस्तु। तेथ प्रभवों आम्ही समस्त । तूं जो केवळ विशेषातीत । अप्रभूत अकारण । समस्तांचा तूं प्रभविता । तुजवर नसे प्रभवनकर्ता । यालागीं सर्वप्रभु तूं तत्वता। समर्थ सत्तायोगबळें। ज्ञाप्तिमात्रत्व तुझें कैसें। यथामति तें कथिजेत असे ।  करुणानिधे कारुण्यवशें । तें तूं परिसें साकल्यें ।

कृष्णाला शरण आलेला माहेश्वर ज्वर म्हणाला- हे प्रभो ! आपली शक्ती अनंत आहे. आपण परमेश्वर आहात, आत्मा आहात. आपण अद्वितीय आणि परम ज्ञानस्वरूप आहात. संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांचे कारण आपणच आहात. श्रुती आपलेच वर्णन करतात. आपण समस्त विकाररहित असे स्वत: ब्रह्म आहात. मी आपणांस प्रणाम करीत आहे.

Ad. देवदत्त परुळेकर

Related Stories

दहशतवाद संपलेला नाही

Patil_p

खुर्चीच्या ओढाताणीत जनतेची कुतरओढ!

Patil_p

बेकारीला पर्याय : स्वयंरोजगाराचा उपाय

Amit Kulkarni

मकरसंक्रांत कोणासाठी गोड ठरणार?

Amit Kulkarni

जम्मू-काश्मीरमधील स्थित्यंतर

Patil_p

टोकियोचा तिढा

Patil_p
error: Content is protected !!