Tarun Bharat

तृणमूल नेत्याकडून महिलेला मारहाण

वृत्तसंस्था/ बालुरघाट

 पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या गुंडगिरीचे एक हादरवून टाकणारे चित्र समोर आले आहे. दक्षिण दिनाजपूर जिल्हय़ात तृणमूल नेत्याच्या नेतृत्वाखालील समर्थकांनी गावातील शिक्षिकेला निर्दयी मारहाण केली आहे. तृणमूलच्या गुंडांनी जमिनीवर बळजबरीने कब्जा करण्याच्या उद्देशाने शिक्षिकेला दोरखंडाने बांधून काही अंतरापर्यंत फरफटत नेत अमानुष मारहाण केली आहे. या मारहाणीनंतर तृणमूल नेत्याने शिक्षिकेला एका घरात कोंडून ठेवले आहे.

नंदनपूर गावात ही घटना घडली असून संबंधित शिक्षिका स्मृतिकण दास ही भाजपची समर्थक आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी शिक्षिकेची आई आणि अन्य कुटुंबीयांनाही मारहाण केली आहे. उपसरंपच अमल सरकार आणि अन्य कार्यकर्ते मारहाण करताना चित्रफितीत दिसून येत आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिक्षिकेचे हातपाय बांधून ठेवल्याने ती जमिनीवर कोसळल्याचे चित्रफितीत दिसून येते. शिक्षिकेला सुमारे 30 फुटांपर्यंत फरफटत नेण्यासह जबर मारहाण करण्यात आली आहे. शिक्षिकेची बहिण सोमा यांनी बचावाचा प्रयत्न केला असता तृणमूल कार्यकर्त्यांनी तिलाही मारहाण केली आहे.

स्थानिक रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर शिक्षिकेने अमल सरकार आणि तृणमूलच्या चार कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी तपास सुरू असून प्रत्यक्षदर्शींशी संपर्क साधत असल्याचे पोलीस अधिकाऱयाने म्हटले आहे.

Related Stories

मुंबईत संशयित दहशतवादी ताब्यात

Patil_p

सीमाभागात शांतता प्रस्थापित करण्यावर भारत-चीनचे एकमत

datta jadhav

पलक्कडमध्ये कार्यालय सुरू करणार मेट्रोमॅन

Amit Kulkarni

त्रिपुरामधील मंत्र्यांच्या विधानावरून वाद

Patil_p

मिग-21 कोसळले, पायलट बचावला

Patil_p

4 वर्षीय मुलीला लागण, कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा

Patil_p