Tarun Bharat

तृणमूल-भाजपच्या लढाईत डाव्यांची भूमिका महत्त्वाची

Advertisements

डाव्या पक्षांनी चांगली कामगिरी केल्यास भाजपला नुकसान, संयुक्त मोर्चाने लक्षणीय मते मिळविल्यास तृणमूलला फटका

पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष लढत देण्याच्या मनस्थितीत दिसून आले आहेत. मागील काही वर्षांमध्ये त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील सत्ता गमावलेल्या डाव्या पक्षांकडे केवळ केरळमध्ये सरकार राहिले आहे. अलिकडेच तेथेही विधानसभा निवडणूक झाली असून काँग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये डाव्या पक्षांची पिछेहाट अत्यंत वेगाने झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांच्या पारंपरिक समर्थकांचा एक वर्ग भाजपमध्ये दाखल झाला. याचबरोबर डाव्या पक्षांच्या समर्थकांमुळेच भाजपला राज्यातील 42 पैकी 18 लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळू शकला आहे.

बंगालची विधानसभा निवडणूक बऱयाचअंशी भाजप आणि सत्तारुढ तृणमूल काँग्रेस यांच्याभोवती केंद्रीत असली तरीही डावे पक्ष राजकीय जाणकारांना चकित करू शकतात. या निवडणुकीत डाव्या पक्षांचे भवितव्यच पणाला लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत जे घडले, ते पुन्हा होणार नसल्याचे मला वाटते. भाजप आणि तृणमूल दोघेही छद्मयुद्ध करत असल्याचे जनता ओळखून आहे. प्रत्यक्षात हे दोन्ही पक्ष एकच आहेत. केवळ डावे पक्षच त्यांना पर्याय आहेत. लोक राज्याच्या निवडणुकीत वेगळय़ा मुद्दय़ांवर मतदान करतात आणि डावे पक्ष या निवडणुकीत चांगली कामगिरी करतील असे उद्गार माकपचे वरिष्ठ नेते मोहम्मद सलीम यांनी काढले आहेत.

ममतांकडून खच्चीकरण

2006 मध्ये 50 टक्के मते मिळविलेल्या डाव्या पक्षांना 2011 च्या निवडणुकीत 40 टक्के मते प्राप्त झाली होती. 2016 च्या निवडणुकीत डाव्या पक्षांची मतांमधील हिस्सेदारी आणखीन कमी होत 26 टक्क्यांवर आली होती. त्या निवडणुकीत डाव्या पक्षांना मिळालेली मते काँग्रेसपेक्षाही कमी होती. पश्चिम बंगालच्या सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कट्टर प्रतिस्पर्धी म्हणजेच डाव्या पक्षांचे अस्तित्व संपविण्याच्या दृष्टीनेच पावले उचलली आहेत. माकप कार्यकर्त्यांचा एक मोठा वर्ग तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाला आणि डाव्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले.

आश्वस्त करावे लागणार

 सर्वात भरवशाचे मतदारही डाव्या पक्षांच्या विजयाची शक्यता फेटाळून लावत आहेत हीच त्यांची मोठी समस्या आहे. डाव्या पक्षांना सर्वप्रथम अशा मतदारांना आश्वस्त करावे लागणार आहे. पराभूत होणाऱया पक्षाला मत का द्यावे अशी विचारणा डाव्या पक्षांचे समर्थक मतदारच करू लागले आहेत.

डाव्यांविरोधात भाजपामुल

बंगाल विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांच्या कामगिरीची महत्त्वाची भूमिका आहे. डावे पक्ष स्वतःच्या समर्थकांना परत आणण्यास यशस्वी ठरले तर यामुळे भाजपला नुकसान होणार आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि फुरफुरा शरीफचे मौलवी अब्बास सिद्दीकी यांच्या भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चासोबत आघाडीमुळे मुस्लीम मतांमध्ये विभागणी झाल्यास तृणमूलला चुरशीची टक्कर मिळू शकते. भाजप किंवा तृणमूल नव्हे तर भाजपामुल (भाजप प्लस तृणमूल) आमच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. ते परस्परांची बी-टीम आहेत. याचमुळे राज्यातील जनतेसमोर डावे पक्ष हाच खरा पर्याय आहेत. आम्ही बंगालला बरेच काही दिले आहे. राज्याला आम्ही चांगल्याप्रकारे समजतो असे उद्गार नैहाटीच्या उमेदवार इंद्राणी मुखर्जी यांनी काढले आहेत.

Related Stories

दहशतवाद संपवण्यासाठी अमेरिकेच्या मार्गावर चालावं लागेल : बिपीन रावत

prashant_c

अमित शाह पीएम मोदींच्या भेटीला

datta jadhav

अखेरचा सलाम !

Patil_p

पुन्हा महागाईचा चटका

Patil_p

तंतुवाद्यांसह निर्यात होणाऱ्या वस्तूवर वजन मोजून शुल्क आकारणार

Nilkanth Sonar

सीएनजीच्या दरात आणखी 2 रु. वाढ

Patil_p
error: Content is protected !!