Tarun Bharat

तृषा हम्मण्णावरची खेलो इंडियासाठी निवड

Advertisements

बेळगाव : यूथ ऑफ स्पोर्ट्स अफेअर्स यांच्या वतीने घेण्यात आलेल्या खेलो इंडिया निवड चाचणीत बसवण कुडचीची कन्या व सध्या गोवा येथे अलमेडा स्कूल फोंडाची विद्यार्थीनी तृषा जयंत हम्मण्णावर हिची टेबलटेनिसमध्ये खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दक्षिण विभागिय खेलो इंडिया निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीत तृषा जयंत हम्मण्णावर हिने टेबलटेनिस प्रकारात उत्कृष्ट कामगिरी बजावली. या कामगिरीच्या आधारे तिची खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. फोंडा, गोवा येथील क्रीडा निर्देशक जयंत हम्मण्णावर यांची ती कन्या असून, ज्युनियर गटात गोवामध्ये ती अग्रमानांकित टेबलटेनिसपटू आहे. यापूर्वी 3 वेळा राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. गोव्यातील टेबलटेनिस स्पर्धेतही तिने यश मिळविले आहे. बेळगाव हेस्कॉमचे अधिकारी आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू संजु हम्मण्णावर यांची ती पुतणी आहे.

Related Stories

कांदा, बटाटा आवक किंचीत वाढली

Patil_p

येळ्ळूर संपूर्ण लॉकडाऊन; ग्रा.पं.कडून जनजागृती

Amit Kulkarni

क्रिकेटचा चेंडू चिमुकल्याचा ठरला काळ

Amit Kulkarni

कोरोना काळातील आशा कार्यकर्त्यांचे कार्य कौतुकास्पद

Patil_p

पशुवैद्यकीय दवाखान्याचे लवकरच स्थलांतर

Amit Kulkarni

कृष्णाकाठी भक्तांची मांदियाळी

Patil_p
error: Content is protected !!