Tarun Bharat

तेंडुलकर, संगकारा, जयवर्धने सर्वोत्तम फलंदाज : पनेसर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आणि माजी कसोटीवीर माँटी पनेसरने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत खेळताना जगातील सर्वोत्तम फलंदाजांची निवड केली आहे. भारताचा सचिन तेंडुलकर तसेच श्रीलंकेचे कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने हे सर्वोत्तम फलंदाज असल्याचे पनसेरने म्हटले आहे.

आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत खेळताना अनेक देशांच्या फलंदाजा संदर्भात बोलताना पनेसर पुढे म्हणाला की, भारताचा वीरेंद्र सेहवाग हा जगातील सर्वात स्फोटक फलंदाज तर राहुल द्रविड हा अभेद्य भिंत (द वॉल) म्हणून ओळखले गेले. पनेसरने 50 कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले असून त्याने भारताविरूद्ध 11 कसोटी सामन्यात खेळताना चारवेळा सचिन तेंडुलकरला बाद केले. 2006 साली नागपूरच्या कसोटीत पनेसरने आपले कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना सचिनला बाद केले होते. त्यानंतर 2012 साली मुंबईच्या कसोटीत पनेसरने सचिनला दोन वेळा बाद केले होते. इंग्लंडने भारतातील ही कसोटी मालिका जिंकली होती.

सचिन तेंडुलकर हा जगातील दर्जेदार फलंदाज म्हणून ओळखला जातो. चेंडूवर नजर बसल्यानंतर तो नेहमीच अधिक धावा नोंदविण्यासाठी आतुरलेला पाहावयास मिळतो आणि त्याला लवकर बाद करणे गोलंदाजाला अवघड जाते, असेही पनेसर म्हणाला. माँटी पनेसरने 50 कसोटीत 34.71 धावांच्या सरासरीने 167 बळीं घेतले आहेत. माँटी पनेसर सध्या लुटॉन येथील आपल्या निवासस्थानी कोरोना महामारीमुळे वास्तव्य करीत आहे.

Related Stories

बोपण्णा-कुरेशी पहिल्याच सामन्यात पराभूत

Patil_p

लिटॉन दास-रहीम यांची अभेद्य द्विशतकी भागीदारी

Patil_p

आगामी प्रो लिग हॉकी पात्रतेसाठी कर्णधार सविताचे

Patil_p

भारताचा न्यूझीलंडविरुद्ध धडाकेबाज मालिकाविजय

Patil_p

द. आफ्रिका-विंडीज वनडे मालिका बरोबरीत

Patil_p

लेवान्डोवस्की, पुटेलास यांना फिफाचे पुरस्कार

Patil_p