ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमधील नेते तेजस्वी यादव यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. तेजस्वी यांनी पाटणा येथील पोलो रोड स्थित आपल्या सरकारी निवासस्थानाचे रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये केले आहे. या कोविड सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन, औषधे यासह सर्व सुविधा उपलब्ध असून या सर्व सुविधा निःशुल्क असणार आहेत. तसेच रूग्णांना मुफ्त जेवणाची सोय देखील केली जाणार आहे.


- सरकारकडे केली ‘ही’ मागणी
सरकारी निवासस्थान कोविड सेंटर सुरू केल्यावर त्यांनी बिहार सरकारला पत्र लिहिले असून त्यांनी सरकारकडे या निवस्थनात तयार केलेल्या सेंटरला सरकारने आपल्या अधिकारी क्षेत्रात सहभागी करून घ्यावे आणि येथे रुग्णांना उपचारासाठी पाठवण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
यापूर्वी मंगळवारी तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहून राज्यात दौरा करण्यास, कोरोना रुग्णांची परिस्थिती जाणून घेण्यास आणि त्यांना मदत करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर आज त्यांनी स्वतःच्या सरकारी निवासस्थानात कोविड सेंटर सुरू केले आहे.