Tarun Bharat

तेजोमय इतिहासाचा साक्षीदार किल्ले सज्जनगड मशालोत्सवाने उजळला

● दिवाळीच्या पहिल्या दिवशी मशालोउत्सव उत्साहात साजरा ● शिवरायांच्या जयघोषाने परळी पंचक्रोशी दणाणून गेली● गतवर्षीपेक्षा यावर्षी मशालोत्सवास वाढता प्रतिसाद ● शेकडो शिवभक्तांची सज्जनगडावर हजेरी

अमर वांगडे / परळी : 

किल्ले सज्जनगडावर दीपावलीच्या पहिल्या पहाटे मशालोउत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषात किल्ले सज्जनगड परिसर नव्हे तर परळी पंचक्रोशी दणाणून निघाली.   

किल्ले सज्जनगडावर पहाटे चार वाजल्यापासूनच दुर्गप्रेमी दाखल झाले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मशाल उत्सवास प्रारंभ करण्यात आला शिवाजी महाद्वार श्री समर्थ महाद्वार झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच सज्जनगड पायरी मार्ग पणत्यांनी उजळला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्जनेने प्रारंभ करण्यात आला. दुर्गप्रेमी समर्थभक्त भाविकांनी मशालोत्सवास गर्दी केली होती. गडावरील महाद्वार, अंगलाई देवी मंदिर,  पेठेतील मारुती मंदिर, श्रीधर कुटी, श्री समर्थ समाधी मंदिर अशी प्रदक्षिणा पूर्ण करून मशालोउत्सव साजरा करण्यात आला. 

शेकडो पणत्या फटाक्यांची आतिषबाजी तसेच शेकडो मशालीमुळे सज्जनगड प्रकाशमय झाला होता. तसेच यावेळी शिवरायांची वेशभूषा केलेले मावळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.  या कार्यक्रमाचे आयोजन परळी पंचक्रोशीतील शिवसमर्थ भक्त दुर्ग संवर्धक यांनी केले होते. तसेच यापुढेही गड संवर्धनाचे व गड-किल्ल्यांचा तेजोमय इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी असे अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे शिवभक्तांकडून सांगण्यात आले.

Related Stories

सातारा हिल मॅरेथॉनचा उद्या होणार थरार!

Patil_p

कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा

Patil_p

नारळाच्या झाडावर वीज पडल्याने आगडोंब

Archana Banage

कोरेगाव शहरात दोन व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांचा छापा

Patil_p

संक्रांतीला धूमस्टाईलने मंगळसूत्र हिसकावले

Patil_p

सातारा जिल्हा सर्वोत्कृष्ट घटक म्हणून घोषित

datta jadhav