Tarun Bharat

तेलंगणातील अभियंता दहशतवादासाठी आर्थिक मदत गोळा करण्याच्या आरोपाखाली दोषी 

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

तेलंगानाची राजधानी हैदराबाद येथील 40 वर्षीय अभियंत्याला दहशतवादासाठी आर्थिक मदत गोळा करण्याच्या आरोपाखाली दोषी ठरविण्यात आले होते. त्याच्या तुरुंगवासाची मुदत संपल्यानंतर अमेरिकेने त्याला हद्दपार केले, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिम जुबैर मोहम्मद याला दोन वर्षापूर्वी अल कायदाचा नेता अन्वर अल-अवलकी याला साहाय्य पुरवल्याबद्दल 2011 मध्ये अटक केली होती.

या कटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला दोषी ठरविल्यानंतर इब्राहिम मोहम्मदला पाच वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच त्याचा भाऊ याह्या मोहम्मद याला 27 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती कारण दहशतवादी प्रकरणातील न्यायाधीशांना ठार मारण्यासाठी त्याने हिटमॅनलाही ठेवले होते.

एका सरकारी अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, इब्राहिम मोहम्मद बुधवारी अमृतसर येथे अमेरिकेतून निर्वासित अन्य भारतीय नागरिकांसह दाखल झाला. त्याला 14 दिवसांसाठी अलग ठेवण्याच्या सुविधेवर पाठविण्यात आले आहे आणि भारतातील कोणत्याही संभाव्य दहशतवादी संबंधांची माहिती घेण्यासाठी भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांकडून त्यांची कसून चौकशी केली जाईल.

शारजा येथे जन्मलेल्या झुबर मोहम्मदने 2001 मध्ये उस्मानिया विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि नंतर त्याचा मोठा भाऊ याह्या फारूक मोहम्मद उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. त्यांनी 2001 ते 2005 पर्यंत इलिनॉय अर्बाना-चँपियन युनिव्हर्सिटीमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यास केला, 2006 च्या सुमारास ओहायोच्या टोलेडो येथे गेले आणि लग्न केले.

इब्राहिम मोहम्मद यांच्यावर प्रश्न विचारणाऱ्या भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, अल कायदाचा नेता अन्वर अल-अवलकीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो स्वत: कट्टरपंथी झाल्याचे दिसून आले आहे.

जेव्हा त्याचा भाऊ दुबईत शिफ्ट झाला, तेव्हा त्याने अमेरिकेत बँक व्यवहारांसाठी इब्राहिम जुबैर मोहम्मदचा अ‍ॅड्रेस प्रूफ वापरला. त्याच्या भावाने इम्राहिम मोहम्मदला त्याचे दोन पाकिस्तानी सहकारी सुलतान सलीम आणि आसिफ सलीम कडून धनादेश जमा करण्यास सांगितले व ते आपल्या भावाच्या खात्यात जमा केले.

2009 मध्ये याह्या फारूक मोहम्मद अवलकीला भेटायला निघाला. जेव्हा ते त्याच्याकडे पोहोचू शकले नाहीत तेव्हा त्यांनी येमेनच्या साना येथे अवलकीच्या एका साथीदारास भेटण्याचे ठरविले. अमेरिकेच्या कोर्टाच्या कागदपत्रांनुसार दहशतवादी हल्ले करण्यासाठी 22 हजार डॉलर्स अवलकीला देण्यात आले.

Related Stories

नव्या बाधितांचा चढता आलेख कायम

Patil_p

देशात कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 356 वर

prashant_c

मुसेवाला हत्येतील चौघांचे एन्काउंटर

Amit Kulkarni

मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे आरक्षण

Omkar B

जगदीप धनखड उपराष्ट्रपतिपदी शपथबद्ध

Amit Kulkarni

भूसुरुंग स्फोटात 2 जवान शहीद, 3 जखमी

datta jadhav
error: Content is protected !!