Tarun Bharat

तेलंगणापासून केरळपर्यंत येणार भाजपचे सरकार!

भाजप नेते तेजस्वी सूर्या यांचे विधान

वृत्तसंस्था/ हैदराबाद

हैदराबादमध्ये होणाऱया महापालिका निवडणुकीत तेलंगणाच्या आगामी विधानसभा निवडणुकीचे प्रतिबिंब दिसून येणार असल्याचा दावा भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला आहे. केवळ तेलंगणाच नव्हे तर तामिळनाडू आणि केरळमध्येही भाजपचे सरकार येणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. .

हैदराबाद येथे प्रचारासाठी पोहोचलेल्या तेजस्वी सूर्या यांनी स्थानिक खासदार असदुद्दीन ओवैसी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ओवैसी यांनी विकासाच्या थापा मारू नयेत. ओवैसी यांच्या तोंडून विकासाच्या गोष्टी हास्यास्पद वाटतात. हैदराबादमध्ये विकासाच्या नावाखाली केवळ रोहिंग्या मुस्लिमांना वसविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जिन्नाचा अवतार

 तेजस्वी यांनी ओवैसी यांना मोहम्मद अली जिन्ना यांचा अवतार संबोधिले आहे. ओवैसी यांना मत देणे म्हणजे भारताच्या विरोधात मतदान करणे आहे. ओवैसी यांना येथे मत मिळाल्यास ते अन्य राज्यांमध्येही बळकट होतील असे उद्गार तेजस्वी यांनी काढले आहेत.

मुख्यमंत्रीही लक्ष्य

तेजस्वी सूर्या यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनाही लक्ष्य केले आहे. केसीआर हैदराबादला इस्तंबूल करू पाहत आहेत. तुर्कस्तानचे अध्यक्ष भारताच्या विरोधात गरळ ओकतात आणि केसीआर हैदराबादलाच इस्तंबूल करू पाहत आहेत. ओवैसी यांच्यासोबत आघाडी करून केसीआर पाकसारखी स्थिती हैदराबादमध्ये निर्माण करू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Related Stories

कन्हैया कुमार काँग्रेसच्या वाटेवर

Amit Kulkarni

विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणारा शिक्षक जेरबंद

Patil_p

351 संरक्षण उपकरणांच्या आयातीवर बंदी

Patil_p

टीका होत असतानाही तिरथ सिंह रावत ‘त्या’ विधानावर ठाम

Archana Banage

24 कॅरेट सोने आता इतिहासजमा

datta jadhav

विवाहाची इतकी कसली घाई?

Patil_p