Tarun Bharat

तेलंगणा – छत्तीसगड सीमेवर चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / रायपुर

सोमवार दि. 27 डिसेंबर रोजी पहाटे तेलंगणा आणि छ्त्तीसगड सीमा भागातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील पेसलपाडू जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली उसुन या चकमकीत 6 नक्षलवाद्यांना यम सदनी धाडण्यास सुरक्षा दलांना यश आले आहे. भद्राद्री कोठागुडेम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.
तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील किस्ताराम पीएस सीमेवरील जंगल परिसरात झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी मारले गेले आहेत. ऑपरेशन अजूनही सुरू आहे, तसेच या स्थितीवर आम्ही आम्ही लक्ष ठेवून आहोत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शोध मोहीम सुरू होती.

तेलंगण ग्रेहाऊंड सैन्याने ही संयुक्त कारवाई केली. पोलिसांनी सांगितले की नक्षलवादी चेरला एरिया कमिटीचे होते, आणि मृतांमध्ये एका वरिष्ठ नेत्याचाही समावेश असू शकतो.सुरक्षा दलांनी व्यापक प्रमाणात हाती घेतलेल्या कारवाईने 6 नक्षवाद्यांचा खात्मा करण्यात आला असला तरी सर्व नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

Related Stories

संचारबंदीत कामगारांकडे ओळखपत्र बंधनकारक

Archana Banage

मुख्यमंत्री शिंदेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट; तरुणावर गुन्हा

datta jadhav

महाराष्ट्र : मंदिरे उघडण्याबाबत सरकारला इतका आकस का? : राज ठाकरे

Tousif Mujawar

लसीकरण करण्याआधीच दुसऱ्या देशांना लस पाठवली ; केंद्र सरकारच्या निर्णयावर अजित पवार संतापले

Archana Banage

कर्नाटक: बारावीचा निकाल जुलैच्या ‘या’ तारखेला होणार जाहीर

Archana Banage

महागाईचा भडका : फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडर दरात वाढ

Tousif Mujawar