Tarun Bharat

तेलनाडे सापडला सम्राट, सावलाचा नंबर कधी ?

मोक्यातील 46 गुन्हेगार अद्याप मोकाट

कोल्हापूर / प्रतिनिधी

मोका अंतर्गत कारवाई होवूनही पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झालेल्या गुंडांना शोधण्यासाठी पोलीस दलाने मोहिम हाती घेतली आहे. इचलकरंजी येथील कुख्यात गुंड संजय तेलनाडे याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असल्या तरी आता पोलिसांच्या रडारावर सम्राट कोराणे, पिंटू सावला, सुनिल तेलनाडे आहेत. दरम्यान जिह्यातील 46 गुन्हेगार अजूनही पोलिसांना चकवा देवून पसार आहेत. त्यांनाही शोधण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर आहे.

खून, मारामारी, दरोडा यासह विविध गंभीर गुह्यांच्या जोरावर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंडाच्या टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येते. गेल्या 5 वर्षात कोल्हापूर पोलीस दलाने 52 टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांवर चांगलाच अंकुश लागला आहे. या 52 कारवायांमध्ये 376 जणांवर कारवाई केली आहे. यापैकी 330 जणांना जेरबंद केले आहे. मात्र अद्यापही 46 गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरत आहेत. या मोकाट गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे.

मटका रॅकेट प्रकरणातील मुख्य संशयीत सम्राट कोराणे, प्रकाश उर्फ पप्पू सावला, हे अद्यापही मोकाट आहेत. संजय तेलनाडे याचा भाऊ सुनिल तेलनाडे, जयसिंगपूर येथील इराणी गँगचे हैदर उर्फ शब्बीर सरताज उर्फ सरदार इराणी, कासिम सलीम इराणी, मोहम्मद शौकत इराणी, मुस्लिम जाफरी इराणी यांच्यासह किरण माने हे मुख्य फरार आहेत. यांच्यावर मोका कारवाई होवून त्याचे दोषारोपपत्रही दाखल झाले आहे. मात्र अदयापही पोलिसांच्या हाती लागले नाही आहेत.

पसार असणारे संशयीत आरोपी हायटेक झाले आहेत. ते कोल्हापूर पासून कर्नाटक, मुंबई, पुणे, गुजरात किंवा नेपाळचा आश्रय घेत आहेत. घरी किंवा नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी ते सोशल मिडीयाचा वापर करतात. व्हॉट्सऍपच्या माध्यमातून कॉलिंग करतात यामुळे त्यांना ट्रेस करणे कठीण जात आहे. यामुळे पोलीस दलाने आता या पसार आरोपींना मदत करणाऱ्या अदृश्य हातांवर वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यांना आर्थिक रसद कशा प्रकारे पोहोचवली जाते याचा शोध सुरु आहे.

मोका किंवा अन्य गंभीर गुह्यातील आरोपींना शोधण्यासाठी एक विशेष पथक काम करत आहे. यामुळेच संजय तेलनाडेच्या मुसक्या आवळण्dयात पोलिसांना यश आले आहे. सम्राट कोराणे, सुनिल तेलनाडे, पप्पू सावला यांचाही शोध सुरु आहे. लवकरच सम्राटसह सर्वांना अटक करण्यात येईल असे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

Related Stories

कोरोना काळात देवदूत बनलेला अभिनेता सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

बारावीचा निकाल उद्या

datta jadhav

कोल्हापूर : कारंडेंसह चार जणांचा अटकपूर्व जामिन पेटाळला

Archana Banage

‘तात्यासाहेव कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयास स्वायत्त अभिमत संस्थेचा दर्जा’

Archana Banage

बेपत्ता झालेल्या ‘त्या’ पाच तरुणांना चीन आज भारताच्या हवाली करणार

datta jadhav

इंदू मिलवरुन राजकारण करु नये : उध्दव ठाकरे

Tousif Mujawar