Tarun Bharat

तेलाच्या ऐतिहासिक घसरणीने बाजार कोसळला

सेन्सेक्स 1011.29 अंकानी घसरला : इंडसइंडचे समभाग सर्वाधिक घसरणीत 

मुंबई /वृत्तसंस्था

चालू आठवडय़ातील शेअर बाजाराची सुरुवात तेजीच्या कामगिरीने झाली होती. तर त्या मागील आठवडय़ात दोन सत्रातही समाधानकारक कामीगरीची नोंद बीएसई सेन्सेक्सने केली आहे. आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारच्या सत्रात मात्र जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाची किंमत ऐतिहासिक घसरणीवर पोहोचल्याचा परिणाम बीएसई सेन्सेक्सवर झाल्याचे पहावयास मिळाले.

प्रामुख्याने बँकिंग,आयटी आणि वाहन कंपन्यांचे समभागांची जोरदार विक्री झाली आहे. सकाळी सेन्सेक्स 811.81 अंकानी तर निफ्टी 244.90 अंकानी घसरणीसह सुरु झाला होता. तर दिवसअखेर सेन्सेक्स 1011.29 अंकांनी घसरुन निर्देशांक 30,636.71 वर बंद झाला. दुसऱया बाजूला निफ्टी 280.40 अंकांनी घसरुन निर्देशांक 8,981.60 वर बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये प्रामुख्याने बँकिंग क्षेत्राला मोठे नुकसान झाले आहे. यात इंडसइंड बँक 12.41, आरबीएल 8.82, ऍक्सिस बँक  7.91, आयसीआयसीआय बँक 8.73, फेडरल बँक 5.97, स्टेट बँक3.90 आणि कोटक बँक यांचे 4.17 टक्क्मयांनी  घसरले आहेत. तर बीएसईमधील 65 टक्के कंपन्यांचे समभाग मंगळवारी नुकसानीत राहिल्याचे दिसून आले आहेत.  

कच्च्या तेलाचे भावात ऐतिहासिक घसरण झाली असून प्रथमच हा निचांक टप्पा गाठला  आहे. यांचा परिणाम अमेरिका आणि चीनमधील शेअर बाजार कोसळण्यावर झाला आहे. त्यामुळे या घडामोडींमुळे भारतीय बाजारात हजार अंकांनी घसरण नेंदवण्यात आली. फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आदी शेअर बाजारात मात्र तेजीचे वातावरण राहिले होते. परंतु कोरोनाच्या संकटामुळे आशियाचा आर्थिक विकास दर अतिशय खराब राहण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.

Related Stories

तंत्रज्ञानाच्या मदतीने अर्थव्यस्थेला बळकटी देणार

Patil_p

लेनोव्हाचा नवा टॅबलेट लाँच

Patil_p

भारतीय बाजारात घसरणीचे सत्र कायम

Amit Kulkarni

उद्योगपती पालोनजी मिस्त्री यांचा व्यवसाय विस्तार 50 देशात

Patil_p

नैसर्गिक गॅसच्या किमतीमध्ये 26 टक्क्मयांची कपात

Patil_p

सेन्सेक्स प्रभावीत ; निफ्टी किंचीत तेजीत

Patil_p