Tarun Bharat

‘ ते ‘ चार पॉझिटिव्ह दुर्गमानवाडच्या विठ्ठलाई दर्शनासाठी येऊन गेल्याचे स्पष्ट

वार्ताहर / आवळी बुद्रुक

राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथील विठ्ठलाई देवीच्या दर्शनासाठी कणेरकरनगरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासह चारजण येऊन गेल्याचे स्पष्ट झाल्याने दुर्गमानवाड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांचा येथील एका व्यक्तीशी संपर्क आल्याने ती व्यक्ती स्वतःहून स्वॅब तपाणीसाठी राधानगरीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली आहे.

सोमवारी सकाळी ओमनी कारमधून विठ्ठलाई देवीच्या ते दर्शनासाठी आले होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून मंदिर दर्शनासाठी बंद असल्याचे त्यांना सांगण्यात आले.त्यानंतर त्यांनी बाहेरूनच देवीचे दर्शन घेतले.यादरम्यान या व्यक्तींचा एका दुकानदाराशीं संपर्क झाला. त्यामुळे मंदिर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असल्याने संपूर्ण गावातून निर्जंतुकीकरण मोहिमही राबविण्यात आली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून हे मंदिर दर्शनासाठी भाविकांना बंद केले आहे.पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंदच राहणार असून भाविकांनी दर्शनासाठी येवू नये असे आवाहन सरपंच युवराज गुरव देवस्थान समिती व कोरोना समिती यांनी केले आहे.

Related Stories

संजदकडून रालोआल उमेदवाराला समर्थन

Patil_p

कोल्हापूर हद्दवाढीचा संघर्ष पेटण्याची चिन्हे; उचगावात ‘गाव बंद’ आंदोलनाची सुरुवात

Archana Banage

चालू हंगामातील 3.75 दशलक्ष टन साखर निर्यातीला मान्यता

Patil_p

जातीच्या सुंदरांना काहीही शोभते

Tousif Mujawar

अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

Patil_p

सिडनीत कोरोनाने वाढवली चिंता 17 जुलैपर्यंत निर्बंध

Patil_p