Tarun Bharat

तैवानात चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी

Advertisements

तैपैई / वृत्तसंस्था :

चीनची 18 लढाऊ विमाने शुक्रवारी संध्याकाळी तैवानच्या हवाईक्षेत्रात घुसली होती. ही लढाऊ विमाने काही मिनिटांपर्यंत तेथे उड्डाण करून परतली आहेत. अमेरिका आणि तैवानला हा इशारा असल्याचे चीनकडून याप्रकरणी म्हटले गेले आहे. चिनी लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत घुसली असताना अमेरिकेचे सचिव कीथ क्रेच हे तैवानची राजधानी तैपैई येथील कार्यक्रमात उपस्थित होते.

चिनी लढाऊ विमाने तैवानच्या सीमेतून परतल्याच्या काही वेळातच चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाचे विधान समोर आले. जे लोक आगीची खेळत आहेत, ते होरपळतील असे कर्नल रेन गुओकियांग यांनी म्हटले आहे. चीन भारतानंतर तैवानशी आगळीक करण्याचा प्रयत्न करत आहे. जूनपासून आतापर्यंत लडाख येथील सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न चीनकडून सुरू आहे.

अमेरिका तैवानसोबत

महामारी सुरू झाल्यावर तैवानची खाडी आणि दक्षिण चीन समुद्रात क्षी जिनपिंग  यांचे शासन छोटय़ा देशांवरील दबाव वाढवत आहे. चीन तैवानला स्वतःचा भूभाग मानतो. अमेरिका आता उघडपणे तैवानसोबत उभा ठाकला आहे. दोन्ही देशांदरम्यान अब्जावधी डॉलर्सचा संरक्षण करारही होऊ घातला आहे. काही महिन्यांमध्ये चीनने तैवानच्या हवाई तसेच सागरी सीमेचे अनेकदा उल्लंघन केले आहे.

तैवानची प्रत्युत्तराची तयारी

चिनी लढाऊ विमानांच्या घुसखोरीवेळी तैवानने स्वतःची हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा सक्रीय तसेच अतिदक्षतेच्या इशाऱयावर ठेवली होती. परंतु तैवानकडून प्रत्युत्तरादाखल कारवाई होण्याची भीती वाटल्याने चिनी लढाऊ विमाने त्वरित माघारी परतली आहेत. बुधवारीही चीनच्या दोन लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाईसीमेत घुसखोरी केली होती.

अमेरिकेकडून जेट क्षेपणास्त्रांचा पुरवठा

अमेरिकेसोबत होणाऱया कराराच्या अंतर्गत तैवानला विशेष क्षेपणास्त्रs मिळणार आहेत. ही क्षेपणास्त्रs चीनच्या कुठल्याही भागाला मिनिटांमध्ये बेचिराख करू शकतात. अमेरिकेच्या कायद्यानुसार आतापर्यंत तैवानला केवळ बचाव करणारी शस्त्रास्त्रs विकली जात होते. तैवानमध्ये सेई इंग वेन यांचे सरकार असून ते चीनचे कट्टर विरोधक मानले जाते. याचमुळे अमेरिकेचे प्रशासन कायद्यात बदल करून ही क्षेपणास्त्रs पुरविणार आहे. कराराच्या अंतर्गत एजीएम-84एच/के एसएलएएम-ईआर क्षेपणास्त्रs दिली जाणार आहेत. हवेतून जमिनीवर मारा करणाऱया या क्षेपणास्त्राची निर्मिती बोइंगने केली आहे.

Related Stories

चीनचे विदेश मंत्री भारतात येण्याची शक्यता

Patil_p

व्हीव्हीआयपी सुरक्षेप्रकरणी मान सरकारचा यु-टर्न

Amit Kulkarni

जम्मू-काश्मीर : तरुणांचे दहशतवादाकडे वळण्याचे प्रमाण घटले

prashant_c

‘निवडणूक रोखे’ स्थगितीस नकार

Patil_p

ब्रिटनहून दिल्लीत आलेल्या 5 संक्रमितांचे विमानतळावरून पलायन

datta jadhav

संरक्षण क्षेत्राच्या पदरी निराशाच

Patil_p
error: Content is protected !!