Tarun Bharat

तोतया ‘रॉ’ अधिकाऱयाला अटक

Advertisements

पोलिसांची वर्दी घालून करायचा बतावणी,

प्रतिनिधी/ सातारा

मी ‘रॉ’ चा एजंट आहे. थेट भरती दिल्लीत होत असते. सहज फिरायला आलो आहे, अशी बतावणी करणाऱया सातारा तालुक्यातील गवडी येथील नयन राजेंद्र घोरपडे या युवकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्या खोटय़ा वर्दीची वरात कासवरच्या देवकल गावापासून तालुका पोलीस ठाण्यापर्यंत काढली. त्याच्याकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी केले आहे.

  याबाबत सातारा तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, महाशिवरात्रीच्या दिवशी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पथक कास रस्त्यावर गस्त घालत होते. त्याच दरम्यान, डीबीचे सुजीत भोसले, नितीराज थोरात यांना दोन युवक दुचाकीवरुन गेलेले दिसले. त्यातील एका युवकाच्या अंगावर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांचा गणवेश होता. त्यांनाही संशय आला की आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे नवीन कोण फिरत आहे. म्हणून त्यांनी त्या दुचाकीचा पाठलाग केला. युवकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने दुचाकी देवकल गावाच्या हद्दीत अडवली. कोणत्या विभागाचे अधिकारी अशी विचारणा सुजित भोसले व नितीराज थोरात यांनी करताच मी रॉ चा एजंट आहे. अधिक माहिती मला देता येत नाही, असे उत्तर दिल्यानंतर सुजित भोसले यांचा आणखी संशय बळवताच त्यांनी त्या तोतयास तालुका पोलीस ठाण्यात चौकशीला यावे लागेल असे म्हणून पोलीस ठाण्यात आणले.

  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने चौकशी केली असता त्याचा ‘रॉ’ शी काहीही संबंध नव्हता. तरीही त्याने पोलीस अधिकाऱयांचा वेष परिधान करुन फिरत होता. तसेच त्याच्या गावातही रॉ च्या विभागात नोकरीला असल्याचे सांगितले होते. यावरुन सुजित भोसले यांनी तालुका पोलीस ठाण्यात नयन घोरपडे याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. त्याचा तपास पोलीस नाईक महेंद्र पाटोळे हे करत आहेत.

  ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती ऑँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व डीबी पथकातील पोलीस नाईक सुजित भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सागर निकम, सतीश पवार, नितीराज थोरात, पोलीस नाईक महेंद्र पाटोळे, पोलीस नाईक हेंमत शिंदे यांनी केली आहे.

फसवणूक झाली असल्यास तालुका पोलिसांशी संपर्क साधावा

सातारा तालुक्यातील गवडी गावातील नयन राजेंद घोरपडे या तोतयागिरी करणाऱया युवकास अटक केली आहे. त्याच्याकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांनी कलेले आहे.

जिम अन् सातारा पोलिसांच्या हालचालीवर सगळी नजर

नयन घोरपडे हा मुळचा गवडीचा असला तरीही तो शनिवार पेठेत रहायचा. त्याला   अरुण गवळीही आवडायचे. त्यांचा तो फॅनही आहे. तसेच मिल्ट्रीत भरती व्हायचे त्याचे स्वप्न होते. परंतु तो होवू शकला नाही. तसेच सातारा पोलीस दलातील पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यापासून सर्व अधिकाऱयांच्या हालचालींवर त्याची नजर असायची. एवढेच नाही तर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचेच त्याने त्यांच्या फेसबुकवर स्वागत केले आहे. साताऱयातल्या एका जीममध्ये तो दररोज जातो. तेथे तो सायबरमध्ये आहे असे सांगायचा. सातारा शहरातही दोन स्टारची वर्दी घालून फिरायचा. गावातही त्यांने मी रॉमध्ये भरती झालो आहे असे त्याच्या जवळच्या मित्रांना सांगितले आहे. परंतु त्याचा हा बनवाबनवीचा उद्योग सातारा तालुका पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

Related Stories

सोलापूर : बार्शीत बाजार समितीतील व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद

Abhijeet Shinde

बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार ऑनलाईन हॉलतिकीट

datta jadhav

वृद्धाश्रमातील ‘वयोवृद्ध’ लसीकरणापासून वंचित

datta jadhav

पाऊस थांबला, सातारकरांना उन्हाचा चटका

Patil_p

सातारा : पाऊस सुरु असेपर्यंत पंचनामे सुरूच ठेवावेत

Abhijeet Shinde

सोलापूरचं टेंशन वाढलं; आज तब्बल 29 नवे कोरोनाग्रस्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!