Tarun Bharat

तोर्डा येथील अपघातात युवकाचा मृत्यू

प्रतिनिधी / पर्वरी

तोर्डा येथील भरधाव वेगाने स्कुटर चालविणारे  दोन युवक  येथील शिक्षा निकेतनच्या प्रवेशद्वारावरील गेटला  धडकून गंभीर जखमी झाले. यात स्कुटर चालकाचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला. सदरहू अपघात  रविवारी (ता.14) रात्री सव्वा आठ वाजता झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तोर्डा येथील सचिन धाब्यावर काम करणाऱया युवदराज सोनार (19) आणि बिसल सोनार(20) या कामगारांनी सुट्टीचा दिवस असल्याने  हिरो माएस्ट्र? क्र जीए-07, एम-6883 या स्कुटरने फिरण्याचा बेत आखला त्यानुसार ते फेरफटका मारून रात्री धाब्यावर परतत असताना तोर्डा येथील उतरंडीवर स्कुटरवरील ताबा जाऊन त्यांनी उतरंडीवर असलेल्या शिक्षा निकेतन शाळेच्या प्रवेशद्वारावरील गेटवर धडक दिली. भरधाव वेगामुळे धडकेत दोघांच्या डोक्मयाला जबर मार बसला छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे स्कुटरचा चेंदामेंदा झाला होता.  या अपघातातील स्कुटर चालविणारा युवदराज सोनार याचे उपचारादरम्यान निधन झाले असून मागे बसलेला बिसल सोनार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोमेकॉमध्ये उपचार चालू आहेत.  उपनिरीक्षक प्रतीक भट यांनी अपघाताचा पंचनामा केला असून निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करीत आहेत.

Related Stories

मंत्री अधिकृतपणे भेट देऊ शकतात : प्रविण आर्लेकर

Amit Kulkarni

राज्यघटनेतील ‘पंथ’ व ‘धर्म’ यांची व्याख्या स्पष्ट करावी

Amit Kulkarni

आरजी भाजपकडून निधी घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजतात

Amit Kulkarni

नव्या आमदरांना देणार प्रशिक्षण : तवडकर

Amit Kulkarni

तिवरे येथे लाखो लिटर पाण्याची नासाडी

Amit Kulkarni

गोव्यात प्रथमच ‘अभाविप’चे कोंकण प्रांत अधिवेशन

Patil_p