Tarun Bharat

‘तो’ विक्रम न केल्याबद्दल युवराजने मानले आभार!

Advertisements

भारतीय डावखुरा फलंदाज युवराज सिंगने 2007 आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्ध लढतीत एकाच षटकात 6 षटकार खेचण्याचा विश्वविक्रम नोंदवला. आयपीएल ही क्लबस्तरीय स्पर्धा असली तरी कॉट्रेलच्या एका षटकात 5 षटकार खेचत राहुल तेवातिया या विक्रमाच्या जवळपास पोहोचला. पण, त्या षटकातील पाचव्या चेंडूवर राहुलला षटकार मारता आला नव्हता आणि एका षटकात 6 षटकार खेचण्याचा तो विक्रम न केल्याबद्दल युवराज सिंगने राहुल तेवातियाचे खास आभार मानले आहेत!

टी-20 क्रिकेटच्या इतिहासात आजवर एका षटकात 6 षटकार खेचणारा युवराज सिंग एकमेव भारतीय फलंदाज आहे. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध त्याने हा पराक्रम गाजवला. त्या पराक्रमाला या निमित्ताने उजाळा मिळाला. युवराजने यावेळी राहुल तेवातियाचे गमतीने आभार मानले. पण, त्याचबरोबर त्याच्या जिगरबाज खेळीचे मनापासून कौतुकही केले. राहुल तेवातियासह त्याच्या संघसहकाऱयांनी खेचून आणलेला विजय निश्चितच प्रशंसेस पात्र आहे, असे ट्वीट युवराजने केले.

Related Stories

कनिष्ठांची विश्व बॅडमिंटन स्पर्धा ऑक्टोबरात स्पेनमध्ये

Patil_p

इंग्लंडने जिंकली धावांची ‘धुळवड’

Patil_p

पुण्याचा महेंद्र चव्हाण नवा महाराष्ट्र श्री

tarunbharat

फिफा मानांकनात बेल्जियम अग्रस्थानी

Patil_p

कुसल परेराला कोरोनाची बाधा

Patil_p

एटीपी मानांकनात फेडरर टॉप-10 मधून बाहेर

Patil_p
error: Content is protected !!