Tarun Bharat

‘तौत्के’चे अतितीव्र वादळात रुपांतर

17 मे पर्यंत गुजरातच्या तटावर घोंघावण्याची शक्यता

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अरबी समुद्रात गेल्या दोन दिवसांपासून कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे रुपांतर आता अतीतीव्र वादळात झाल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हे वादळ आता गुजरातच्या दिशेने निघाले असून ते 17 मे पर्यंत दक्षिण गुजरातच्या सागरतटावर आदळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या वादळाचे नाव ‘तौकते’ असे ठेवण्यात आले असून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

या वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन गुजरात सरकार व केंद्र सरकारने आतापासूनच आपत्ती निवारण कार्याचा प्रारंभ केला आहे. केंद्रीय आपत्तीनिवारण दलांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच गुजरात सरकारच्या पथकांची नियुक्तीही सागरतटावर करण्यास सुरवात झाली आहे. हे वादळ गुजरातच्या दिशेने आल्यास तटावर 175 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि सागरतटावरील मालमत्तांची हानी करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.

जोरदार पर्जन्याची शक्यता

वादळामुळे 16 मे ते 19 मे या कालावधीत दक्षिण गुजरातमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचा परिणाम पूर्व सागरतटांवरही जाणवणार आहे. लक्षद्वीपमध्ये 15 मे च्या आसपास जोरदार पाऊस होईल. तसेच तामिळनाडू आणि केरळच्या तटीय प्रदेशांमध्ये पाऊस होईल. या वादळाचा परिणाम कर्नाटकातील सागरतटांवरही होणार आहे.

Related Stories

इस्रायलमध्ये चेंगराचेंगरीत 44 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Patil_p

रेल्वे वाहन वाहतुकीची क्षमता दुप्पट करणार

Patil_p

वित्तीय तूट जून अखेरीस 18.2 टक्के

Patil_p

जीएसटी संकलनाच्या विक्रमाची ‘गुढी’

Patil_p

नोएडा : सेक्टर 29 मधील गंगा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये लागली आग

Tousif Mujawar

दिल्लीत मार्केट-रेस्टॉरंट 24 तास सुरू राहणार

Patil_p