Tarun Bharat

तौक्ते चक्रीवादळ मंदावले; पण मुंबईत आजही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

ऑनलाईन टीम / मुंबई : 


तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. तरी देखील मुंबईत मंगळवारी पावसाची शक्यता आणि वादळाचा धोका कायम असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांसह आजुबाजूच्या परिसरातील आकाशात काळे ढग दाटून आले आहेत. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरीही बरसत आहेत. याशिवाय, वारेही  नेहमीपेक्षा वेगाने वाहत आहेत. त्यामुळे मुंबईवरील धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तसेच ताशी 120 कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे. खरेतर, कालच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. अनेक ठिकाणी  झाडांचे, घरांचे आणि गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  • मे महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस


मुंबईच्या किनाऱ्यावर प्रत्यक्ष न धडकताही तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी मुंबईला तडाखा दिला. मुंबईसाठी मे महिन्यातील हा विक्रमी पावसाचा दिवस ठरला. मुंबईत सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी 194 मिमी पाऊस झाला तर सरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने केली. यापूर्वी आतापर्यंतच्या मे महिन्यातील पावसाची सर्वाधिक नोंद ही 19 मे 2000 रोजी करण्यात आली होती. त्या दिवशी सरासरी 190.8 मिमी पाऊस झाला होता. मात्र हा विक्रम तौक्तेच्या परिणामांमुळे मोडीत निघाला आहे. 

Related Stories

मणिपूर : उखरुलमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहचले विविध क्षेत्रातील मान्यवर

Abhijeet Khandekar

‘मला अपमानित झाल्यासारखं वाटतंय’; राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंगांची प्रतिक्रिया

Archana Banage

चामराजनगर : २४ जणांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे : समितीचा अहवाल सादर

Archana Banage

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

महात्मा फुले मोठे की नगरसेविकच्या सासूबाई?

datta jadhav