Tarun Bharat

…त्यांनी त्यांचा बाप दाखवावा : संजय राऊत

ऑनलाईन टीम / मुंबई : 


शिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना रानौत यांच्या मधील ट्विट युद्ध काही थांबायचे नाव घेत नाही आहे. दुपारी कंगनाने मी मुंबईत येत आहे, अशा आशयाच्या लिहिलेल्या ट्विटला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. promise. जय हिंद जय महाराष्ट्र…असे ट्वीट करत उत्तर दिले आहे. 


याआधी कंगनाने ट्विट करून म्हटले होते की,  अनेकांनी मला मुंबईत न येण्याची धमकी मला दिली आहे. पण तरीही मी येणारचं. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला त्यांनी रोखून दाखवावे, असे आव्हान दिले होते. त्याला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Related Stories

आचरा समुद्रात ऑलिव्ह रिडले कासवांच्या ७५ पिल्लांना सोडले

Anuja Kudatarkar

महाराष्ट्रातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून; 75% उपस्थिती बंधनकारक नाही : उदय सामंत

Tousif Mujawar

सांगली-कोल्हापूर पॅसेंजर लवकरच सुरू होणार

Archana Banage

शरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं ? : सुधीर मुनगंटीवार

prashant_c

अमृतसर मेडिकल कॉलेजला मिळाली प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्याची परवानगी

Tousif Mujawar

विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने उचलले पाऊल..!

Archana Banage