Tarun Bharat

..त्याचं तत्परतेनं बहुजन बांधवांनाही नियुक्त्या द्याव्यात : आमदार पडळकर

ऑनलाईन टीम/मुंबई

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या आदेशानंतर मराठा बांधवांमध्ये महाराष्ट्रात मोठी संतापाची लाट उसळली आहे. यातच राजकीय मंडळीमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याच मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाना साधला आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांची तातडीने मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तर, पडळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून काही मागण्या देखील केल्या आहेत.

मराठा आरक्षण रद्द झाले ही वेदनादायी गोष्ट असून त्यासाठी महाविकासआघाडी जबाबदार आहे. पण उर्वरित समाजाचं काय? मराठा समाजाबरोबरच इतर भटक्या, मागासवर्गीय, अनुसुचित जाती व जमातींमधील युवकांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या 76 विद्यार्थ्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पुढेही आरक्षण न टिकल्यास या जागांचं काय करायचं? इतर सर्व मागासवर्गीय, NT, SC, ST प्रवर्गातील 365युवकांना अजून नियुक्ती नाही. यांना नियुक्या मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार असूनही सरकार टाळाटाळ करत आहे. याचा उद्रेक झाल्यास महाविकास आघाडी सरकारच पाप ठरेल, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

तर, सदर नियुक्त्यांचा अधिकार हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. त्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींना हात जोडून विनंती करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तात्काळ या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार पडळकर यांनी या पत्रात केली आहे.

Related Stories

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक; ‘या’ विषयांवर होणार चर्चा

datta jadhav

बांगलादेशातही आर्थिक संकट; रात्रीत इंधनाचे भाव ५० टक्क्यांनी वाढले

Archana Banage

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुणे नॉलेज क्लस्टर व आयुका यांच्यासोबत सामंजस्य करार

Tousif Mujawar

…तर आम्ही मातोश्रीवर परत जाऊ – संजय राठोड

Kalyani Amanagi

राज्यात दोन दिवसात कोरोनाचे 80 रुग्ण

Patil_p

RBI चे पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये पुन्हा वाढ

Archana Banage