ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसाठी परवानगी मागणाऱ्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला आहे. आज न्यायालयाने जनतेच्या आरोग्याबद्दल धोका घेऊ शकत नाही, असे सांगत ही मागणी फेटाळून लावली.
Advertisements
दरम्यान, मोहरम मिरवणुक काढण्यास परवानगी मिळावी अशी मागणी करणारी याचिका लखनऊ येथील याचिका कर्त्यानी केली होती.
या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. ही याचिकेला नकार देत देशभरात मोहरम मिरवणुका काढण्यास नकार दिला.
नकार देताना न्यायालयाने सांगितले की, जर आम्ही मोहरम मिरवणुकीस परवानगी दिली तर गोंधळ होईल तसेच कोरोनाचा प्रसार केला असे म्हणत लक्ष्य केले जाईल आणि आम्हाला ते नको आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.