Tarun Bharat

‘त्या’ अकरा जणांच्या अहवालाकडे लक्ष

प्रतिनिधी/  संकेश्वर

शहरातून होमक्वारंटाईन व क्वारंटाईन केलेल्या एकूण 150 जणांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच कोरोनाबाधित कुटुंबातील अकरा जणांच्या स्वॅबचा अहवालदेखील बुधवारी उपलब्ध होणार असल्याने याकडे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले आहे. तालुका प्रशासनाने सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत किराणा बाजारपेठ खुली करण्याची मुभा दिल्याने नागरिकांना सोयीचे ठरले आहे.

येथील एकाला कोरोनाची लागण झाल्याने संकेश्वर शहर सीलडाऊन करण्यात आले आहे. याबरोबरच शहराशी जोडणाऱया सीमा सील करताना चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच विनाकारण फिरणाऱया नागरिकांना काठीचा प्रसाद देण्यात येत आहे. याबरोबरच विनामास्क आणि रस्त्यावर थुंकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 47 जणांवर कारवाई करताना त्यांच्याकडून 4700 रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱयांवर वचक बसण्यास मदत होणार आहे.

सीलडाऊनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी संकेश्वरला भेट दिली. यावेळी त्यांनी सीमाबंदीची पाहणी केली. शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या राखीव पोलीस दलाला भेट देऊन अधिकाऱयांशी चर्चा केली. घराबाहेर कोणीच दिसू नये यासाठी दिसेल त्याची चौकशी करा, विनाकारण बाहेर फिरणाऱयांवर व मास्क न वापरणाऱयांवर कारवाई करा, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

विजापुरात 1866 जणांची तपासणी

विजापुरात 1866 जणांची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत क्वारंटाईनचे 28 दिवस पूर्ण केलेले 378 रुग्ण आहेत. इस्पितळात 48 रुग्ण असून त्यांच्या तब्येतीत सुधारणात होत आहे. आजपर्यंत एकूण 1796 स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. यापैकी 1544 अहवाल निगेटिव्ह व 41 पॉझिटिव्ह आले आहेत. अजून 210 अहवालांची प्रतीक्षा आहे. नागरिकांनी हेल्प लाईन नं. 1077 व 104 आरोग्य सहाय्यवाणीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

खानापूर रोडवर वाहतुकीची कोंडी

Amit Kulkarni

युनियन जिमखाना बचावसाठी सोमवारी रॅली

Amit Kulkarni

शहरातील शंभरहून अधिक लॉजची पोलिसांकडून तपासणी

Amit Kulkarni

येडूर परिसरातील जनतेची बिबटय़ाने उडविली झोप

Amit Kulkarni

सुवर्णसौधमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करा

Patil_p

तीन मुलांना विष पाजून पित्याची आत्महत्या

Patil_p