Tarun Bharat

‘त्या’ गवळी कुटुंबीयांची आणखी एक म्हैस दगावली

एकूण 15 जनावरे मृत्युमुखीः कुटुंबीय अडचणीत

प्रतिनिधी / बेळगाव

मंगळवारपेठ टिळकवाडी येथील गवळी कुटुंबीयांची आणखी एक गाभण म्हैस बुधवारी अज्ञात आजाराने दगावल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. पंधरा-वीस दिवसांपूर्वी या कुटुंबीयांची तब्बल 14 जनावरे मृत्युमुखी पडली होती. त्यामुळे कुटुंबीयासमोर मोठे संकट उभे राहिले होते. त्यातच बुधवारी सकाळी आणखी एक म्हैस दगावल्याने कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

मागील महिन्यात या गवळी कुटुंबीयांची दुभती 14 जनावरे दगावली होती. दरम्यान, दगाविलेल्या जनावरांना ‘मॅलिगंट कटरल फिव्हर’ हा आजार झाल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, हा आजार शेळय़ामेढय़ांपासून उद्भवतो. यावर कोणताही उपचार नाही. काळजी म्हणून जनावरे एकमेकांपासून स्वतंत्र करणे व गोठा स्वच्छ ठेवणे अशा सूचना अधिकाऱयांनी केल्या होत्या. मात्र बुधवारी आणखी एक म्हैस मृत्युमुखी पडल्याने या म्हशीला कोणता आजार झाला होता. हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे कुटुंबीयासमोर चिंता वाढली आहे. शिवाय गोठय़ातील आणखी तीन जनावरे आजारी असल्याने त्यांना संसर्गापासून लांब ठेवण्यासाठी कुटंबीयांची धडपड सुरू आहे. आतापर्यंत गोठय़ातील तब्बल 15 जनावरे मृत्युमुखी पडल्याने गोठा पूर्ण रिकामा झाला आहे. या कुटुंबीयांचा जनावरांच्या दुधावरच उदरनिर्वाह चालतो. मात्र दुभत्या म्हशीच मृत्युमुखी पडल्याने कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. जातिवंत म्हशींची किंमत 80 हजार ते 1 लाखापर्यंत आहे. या गवळी कुटुंबीयांच्या 15 म्हशी दगाविल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पशुसंगोपन खात्याने दगाविलेल्या जनावरांचा पाठपुरावा करून तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

जिमखाना, युनायटेड बालाजी यांचे शानदार विजय

Amit Kulkarni

तालुका परिसरात रताळी लागवड जोमाने

Omkar B

रविवारी जिल्हय़ात 319 नवे रुग्ण

Amit Kulkarni

शालेय विद्यार्थी मध्यान्ह आहारापासून वंचित

Omkar B

अखेर कल्लोळ बंधाऱयाच्या पुनर्निर्मितीला मंजुरी

Omkar B

फळांचे दर सामान्यांच्या आवाक्यात

Amit Kulkarni
error: Content is protected !!