Tarun Bharat

‘त्या’ नऊ मजली इमारतीशी भुजबळांचा संबंध काय?

ऑनलाईन टीम / मुंबई :

अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ज्या नऊ इमारतीत राहतात, त्या त्या इमारतीची मालकी परवेझ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे. त्यामुळे या इमारतीशी भुजबळ यांचा काय संबंध?, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या आज नाशिक दौऱ्यावर आहेत. तेथे एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोमय्या म्हणाले, छगन भुजबळ ज्या नऊ मजली इमारतीत राहतात, तो परवेझ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर आहे. त्यांच्याशी तुमच्या काय संबंध आहे? त्या इमारतीचे तुम्ही भाडे देता की, विकत घेतला आहे, हे भुजबळांनी स्पष्ट करावे.

या इमारतीची मालकी असलेल्या परवेझ कन्स्ट्रक्शनच्या लोकांना ईडीने अटक केली होती. त्यावेळी त्यांनी या इमारतीचे भुजबळांनी आम्हाला रोख पैसे दिले, ते आम्ही या कंपन्यांमध्ये टाकले असे सांगितले होते. त्यामुळे भुजबळ राहत असलेली ही इमारत बेनामी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Related Stories

लखनऊमध्ये एटीएसने दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

Archana Banage

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन वर्ग व परीक्षा 15 फेब्रवारीपर्यंत ऑनलाईन : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

Abhijeet Khandekar

लॉकडाऊन विरोधात व्यापारी रस्त्यावर

Patil_p

महाराष्ट्र : मास्कच्या किंमती अखेर निश्चित; सरकारकडून आदेश जारी

Tousif Mujawar

घर बांधकामाला आता ग्रामपंचायतीची परवानगी हवी

Archana Banage

ठाकरे सरकार पडणार नाही आणि मी झुकणारही नाही…

datta jadhav