Tarun Bharat

‘त्या’ न्यायाधीशांच्या विरोधात सोमवारी निवेदनांचा वर्षाव

विविध दलित संघटनांचे निवेदन व आंदोलने : कारवाई करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

रायचूर येथील जिल्हा न्यायाधीशांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनादिवशी अवमान केला. त्या विरोधात जिह्यातील बहुसंख्य विविध दलित संघटना आंदोलन करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकाऱयांवर निवेदनांचा भडिमार केला आहे. सोमवारीही पाच संघटनांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन त्या न्यायाधीशांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रांती युवा संघटना, वायव्य कर्नाटक रस्ते वाहतूक संस्था अनुसुचित जात नोकर संघटना, जयभीम बहुजन युवा संघ, चलवादी महासभा यासह इतर संघटनांनी त्या न्यायाधीशांविरोधात जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले आहे. रायचूर येथील जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा हे ध्वजारोहण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हटवावी, अशी सूचना केली. ती प्रतिमा हटविल्यानंतरच ध्वजारोहण करू, असे सांगितले. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे. तेंक्हा त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

एक जबाबदार व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱया न्यायाधीशांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर
आहे.

 तेंव्हा त्या न्यायाधीशांवर कारवाई ही झालीच पाहिजे. ज्यांनी देशाची घटना लिहिली त्यांचाच अशाप्रकारे देशामध्ये अवमान होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. सध्या जी घटना घडली आहे ती एका न्यायाधीशांकडून घडली आहे. त्यामुळे हा मोठा अवमान आहे. याचा कोठेतरी विचार होणे गरजेचे आहे. अशाप्रकारे अनेकवेळा अवमान होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही या निवेदनांमध्ये करण्यात आली आहे. 

यावेळी दुर्गेश मेत्री, श्रीकांत मुचंडी, सुरेंद्र तळवळकर, परशराम कांबळे, के. जी. पाटील, डी. एन. कांबळे, संजय राजेश, राजू पन्यागोळ, रामनगौडा मोदगी, संजय कोलकार, एस. एस. कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Related Stories

सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात नक्कीच न्याय मिळणार

Amit Kulkarni

टिळकवाडी राणाप्रताप रोड येथील बंगल्यात धाडसी चोरी

Amit Kulkarni

बेळवट्टी येथे ग्राम वन सेवा केंद्राचे उद्घाटन

Amit Kulkarni

संतीबस्तवाड-तिर्थकुंडये रस्त्याचा वाली कोण?

Amit Kulkarni

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज बेळगावात

Amit Kulkarni

निवृत्त ले.जनरल पी.जे.एस.पन्नू यांची एसकेईला भेट

Patil_p