Tarun Bharat

त्या परिसरातील 542 कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी पंधरा जणांची नियुक्ती

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरातील एक व्यक्ती ग्वाल्हेरला गेल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळला असल्याचे ग्वाल्हेरचे  जिल्हाधिकारी यांनी सांगितले होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दुपारी तपासणी  केल्यानंतर त्यापरिसरातील गावात  542 कुटुंब असून  त्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी  पंधरा जणांची टीम नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर बुधवारी यांनी दिली. सदर रुग्ण सोलापुरात नसून ग्वाल्हेरच्या मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिट असल्याचे शंभरकर यांनी सांगितले.
दरम्यान, या सर्वांची तपासणी केल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी पुढील कारवाई करण्यात येईल . दरम्यान त्या गावातील परिसरात 542 कुटुंब आहेत. या कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी पंधरा जणांची टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवार पर्यंत पूर्ण सर्वेक्षण करून त्या व्यक्तींची तपासणी होणार आहे. संध्याकाळी यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असेही शंभरकर यांनी सांगितले.

Related Stories

तरुण कपूर यांची पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून नियुक्ती

Abhijeet Khandekar

चाकरमानी येण्यास आतूर…पण गावकरी झालेत चिंतातूर

Patil_p

जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

Patil_p

पंतप्रधान मोदींची हायपर रिएलिस्टिक रांगोळी

Patil_p

मयत रुग्णाची हेळसांड झाल्याने वडूज ग्रामीण रुग्णालयात तणाव

Archana Banage

सातारा : कराड येथे तीन नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह

Archana Banage