Tarun Bharat

‘त्या’ महिलेच्या संपर्कातील 27 जण क्वारंटाईनमध्ये

Advertisements

लहान मुले-महिलांचाही समावेश, आज तपासणीसाठी स्वॅब जमवणार

प्रतिनिधी / बेळगाव

मंगळवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील आझाद गल्ली येथील एका 25 वषीय महिलेचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता तिच्या संपर्कातील 27 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून गुरुवारी तपासणीसाठी त्यांचे स्वॅब जमविण्यात येणार आहेत. वडिलांच्या संपर्कातून या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आझाद गल्ली येथील ही महिला संकेश्वर येथील आपल्या माहेरी गेली होती. तिचे वडील रुग्ण क्रमांक 293 च्या संपर्कातून तिला कोरोनाची लागण झाली आहे. संकेश्वर येथील 43 वर्षीय तिचा वडील निजामुद्दिन मरकजमधील धर्मसभेत भाग घेण्यासाठी नवी दिल्लीला गेला होता.

आझाद गल्ली येथील त्याची 25 वषीय मुलगी वडील दिल्लीला गेल्यापासून आपल्या दोन लहान मुलांसमवेत ती माहेरीच होती. वडिलांच्या स्वॅब तपासणीनंतर ती महिला व तिच्या मुलींनाही क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. तिच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ही महिला व तिच्या मुलींचेही स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

सध्या त्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या कुटुंबातील थेट संपर्कात असलेल्या सात जणांबरोबरच या परिसरातील 27 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. वडील दिल्लीतून परतल्यानंतर तब्बल आठ दिवस ही महिला त्यांच्यासोबत माहेरी होती. नंतर लॉकडाऊन जाहीर झाले व ती तिथेच अडकली.

लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहन सेवा बंद असताना ती बेळगावला कशी पोहोचली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 14 एप्रिल रोजी मध्यरात्री तिच्या पती मोटारसायकलवरून संकेश्वर गाठले व तिला त्याच मोटारसायकलवरून बेळगावला आणल्याची माहिती मिळाली आहे. संकेश्वर पोलिसांकडून बेळगाव पोलिसांना यासंबंधीची माहिती मिळाली.

16 एप्रिल रोजी या महिलेच्या वडिलांचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तिलाही क्वारंटाईन करण्यात आले. मंगळवारी तिचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या घटनेने आझाद गल्ली व परिसरात एकच खळबळ माजली असून जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळळी यांनी हा परिसर निर्बंधित प्रदेश जाहीर केला आहे.

मध्यवर्ती ठिकाण निर्बंधित प्रदेश जाहीर

आझाद गल्ली येथील महिलेचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हाधिकाऱयांनी शहरातील मध्यवर्ती ठिकाण निर्बंधित प्रदेश म्हणून जाहीर केले आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून पूर्वेला जुना पी. बी. रोड, पश्चिमेला भातकांडे गल्ली, उत्तरेला खडेबाजार रोड व दक्षिणेला रविवारपेठेतील श्री बसवेश्वर को-ऑप. बँकपर्यंत निर्बंधित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

क्वारंटाईनमध्ये लहान मुलेही

या महिलेच्या संपर्कातील ज्या 27 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात ही महिला जर आपल्या माहेरीच असती तर किमान बेळगाव येथील तिचे कुटुंबीय, नातेवाईक व शेजाऱयांना कोरोनाचा धोका टळला असता. आता या महिलेच्या संपर्कातील 27 जणांची स्वॅब तपासणी होणार असून यामध्ये तिच्या लहान मुलांचाही समावेश आहे.

Related Stories

अखेर हुबळी – मुंबई रेल्वे होणार सुरू

Rohan_P

पाटील गल्लीतील खड्डय़ांमुळे वाहतुकीस अडथळा

Amit Kulkarni

जिल्हाअंतर्गत परवानगीसाठी नागरिकांची मनपाकडे धाव

Patil_p

खानापूर शहर परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

Amit Kulkarni

स्टार एअर बेळगाव-तिरुपती विमानफेरी होणार सुरू

Amit Kulkarni

गटारीतून सांडपाणी वाहण्यास अडथळा

Amit Kulkarni
error: Content is protected !!