Tarun Bharat

‘त्या’ मातेवर लैंगिक अत्याचार, गुन्हा नोंद

प्रतिनिधी/ मडगाव

‘त्या’ अर्भकाला जन्म देणाऱया मातेवर र्लैंगिक अत्याचार करण्यात आलेले असल्याचे उघड झाल्यानंतर कुंकळी पोलिसांनी मोरपिर्ला गावातील गावकर नावाच्या एका युवकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

शनिवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनीच ही माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार गेल्या काही महिन्यापूर्वी केपे तालुक्यातील एका गावातील अविवाहीत युवतीने एका मुलाला जन्म दिला होता.

या युवतीच्या घरामागेच या नवजात मुलाला ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर या युवतीच्या वडिलांना सकाळी सकाळी हे नवजात अर्भक दिसल्याने ही खबर पोलिसांपर्यंत गेली होती.

प्राप्त माहितीनुसार पोलिसानी या नवजात मुलाच्या आईला हुडकून काढले आणि तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणामागे असलेला (की असलेले)  ‘संशयित आरोपी उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

लैंगिक अत्याचार करणे, धमकी देणे यासारख्या आरोपावरुन भारतीय दंड संहितेच्या 376, 506 कलमाखाली कुंकळी पोलिसांनी निलेश गावकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामागे आणखी कोणाचा हात आहे का याचा तपास सध्या पोलीस करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अद्याप या संशयिताला अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

वादळी वाऱयाने फातोर्डा स्टेडियमचे छप्पर उडाले

Amit Kulkarni

‘गोवा ड्रोन धोरण’आज होणार जाहीर

Amit Kulkarni

कर्नाटकचा ‘डीपीआर’ न फेटाळल्यास मुख्यमंत्री राजीनामा देतील काय ?

Amit Kulkarni

मडगावच्या विकासासाठी भाजपला संधी द्या

Amit Kulkarni

गोव्यात बिर्ला मंदिराचे भूमिपूजन

Amit Kulkarni

मडगावातील रस्त्यांची अवस्था दयनीय

Amit Kulkarni