Tarun Bharat

”त्या” मुख्याध्यापकाला झाली अटक

Advertisements

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

पहिले लग्न झाले असल्याचे लपवून दुसऱ्या मुलीशी लग्न करुन दोन्ही पत्नींची फसवणूक करुन धमकावणाऱ्या माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या महिंसगाव ता. माढा येथील मुख्याध्यापकाचे नाव बापूसाहेब बाबासाहेब अडसूळ ( रा आकोली ता मोहोळ सध्या रा भोसरे ता माढा) असे नाव आहे. याबाबत पहिली व दुसरी पत्नी या दोघींनी कुर्डुवाडी पोलिसांत पती बापूसाहेब आडसूळ याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दुसऱ्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन
बापुसाहेबाचे आधी लग्न झाले होते. त्याने 30 मार्च 2021 रोजी फिर्यादी बरोबर लग्न केले.

बापुसाहेब, फिर्यादीचे सासरे बाबासाहेब आडसुळ, सासू आवडाबाई आडसुळ, दिर अनिल आडसुळ, जाऊ दिपाली आडसुळ, नणंद सोनाली क्षीरसागर व लग्नासाठी मध्यस्थी करणारे चांगदेव कांबळे या सर्वांनी मिळुन फिर्यादीच्या आईवडिलांना फसवून बापुसाहेबाचे फिर्यादी बरोबर लग्न केले आहे. फिर्यादीस वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ दमदाटी केली. गेल्या दोन महिन्यापासून पोलिस बापुसाहेबाच्या शोधात होते. त्याला कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांनी दिली.

Related Stories

सोलापूर : माढा तालुक्यात १५० नवे कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

एस.टी. कर्मचा-यांचे वेतन उद्या जमा होणार

Abhijeet Shinde

मास्क न वापरल्यास आता 500 रुपयांचा दंड

Abhijeet Shinde

शेतीच्या बांधावरुन दोन गटात हाणामारी; ८ जण जखमी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शिरोळ येथील मोटर सायकल चोरट्यास अटक

Abhijeet Shinde

सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा सोमवारी ऑनलाईन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!