Tarun Bharat

‘त्या’ विद्यार्थ्यांना हॉलतिकीट नाकारू नका!

Advertisements

प्रतिनिधी/ बेंगळूर

अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये शुल्क बाकी ठेवलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉलतिकीट (परीक्षा प्रवेशपत्र) नाकारू नये, अशी सूचना अधिकाऱयांमार्फत शाळांना देण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली.

विधानसभेत शुक्रवारी शून्य प्रहर वेळेत निजदचे आमदान मंजुनाथ यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ावर शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली. अलीकडेच जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) आणि गटशिक्षणाधिकाऱयांची (बीईओ) बैठक घेऊन त्यांना विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्यास नकार दर्शवू नये, अशी सूचना शाळांना देण्यास सांगितले आहे. डीडीपीआय आणि बीईओंनी खासगी व अनुदानित शाळांमधील फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट देण्यास मनाई करू नये, अशी सूचना शाळा व्यवस्थापन मंडळांना केली आहे. त्यामुळे याविषयी कोणतीही संभ्रमावस्था नाही, असे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली.

तत्पुर्वी आमदार मंजुनाथ यांनी, अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढणे, हॉलतिकीट न देण्याची धमकी दिली जाते. पालकांनी आपल्याजवळ अशा प्रकारची व्यथा मांडली आहे. ही केवळ आपल्या मतदारसंघातील समस्या नाही. राज्यात अशा समस्या अनेक ठिकाणी दिसून येतात, असे सांगितले.

हिजाब घालून परीक्षेला येण्यास निर्बंध

राज्यात कोणत्याही परीक्षांना हिजाब घालून येण्याची मुभा नाही. हा नियम बोर्डाच्या परीक्षांनाही लागू आहे. राज्य उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे प्रत्येक विद्यार्थ्याने पालन केलेच पाहिजे. यंदा दहावी परीक्षेसाठी 8.73 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली.

Related Stories

दिल्ली दंगल – जामिन कायम पण आदेशावर आक्षेप

Patil_p

चिनी उपकरणांच्या खरेदीची चौकशी होणार

Patil_p

देशात 31,522 नवे कोरोना रुग्ण; 412 मृत्यू

Tousif Mujawar

उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारीपदी भाजपकडून धर्मेंद्र प्रधान

Patil_p

अंसार गजवा-तुल-हिंदच्या मुख्य कमांडरचा खात्मा

datta jadhav

जीप नदीत कोसळून 9 वऱहाडींना जलसमाधी

Patil_p
error: Content is protected !!