Tarun Bharat

‘त्या’ शिवप्रेमींना न्यायालयाकडून जामीन

निदर्शने करत जाताना दगडफेक केल्याचा खोटा गुन्हा दाखल प्रकरण

प्रतिनिधी /बेळगाव

छत्रपती शिवाजी महाराजांचा बेंगळूर येथे अवमान झाल्यानंतर बेळगावमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी धर्मवीर संभाजी चौक येथे निदर्शने करून कार्यकर्ते मध्यवर्ती बसस्थानकाकडे निघाले होते. त्यावेळी दगडफेक केली म्हणून खोटा गुन्हा कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने समन्स बजावले होते. त्या सर्वांनी शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहून जामीन मिळविला आहे.

माजी महापौर सरिता पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, मयूर बसरीकट्टी, शुभम सुतार, शुभम बांदेकर, सागर केरवाडकर, सुदेश लाटे, गौरव गेंजी, राधेश शहापूरकर या तरुणांना समन्स बजावण्यात आले होते.

 या सर्वांनी न्यायालयात उपस्थित राहून जामीन मिळविला आहे. मार्केट पोलीस स्थानकामध्ये या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जामिनासाठी सर्वांनी अर्ज दाखल केला होता. जेएमएफसी द्वितीय न्यायालयात या अर्जावर सुनावणी होऊन सर्वांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने
ऍड. श्यामसुंदर पत्तार, ऍड. शंकर बाळनाईक, ऍड. पट्टण,ऍड. विशाल चौगुले हे काम पहात आहेत.

Related Stories

स्मार्ट सिटीची कामे तातडीने मार्गी लावा

tarunbharat

राज्यात वीज दरवाढ होणार का?

Amit Kulkarni

पोदार स्कूलतर्फे सायक्लोथॉन उत्साहात

Amit Kulkarni

‘मराठा’च्या जवानांचा दौडमध्ये सहभाग

Amit Kulkarni

युवा कार्यकर्त्यांतर्फे शंकरगौडा पाटील यांचा सत्कार

Patil_p

श्री पंत महाराजांच्या 117 व्या पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ

Amit Kulkarni