Tarun Bharat

त्या’ समाजकंटकांच्या मुसक्या आवळा

प्रतिनिधी/ बेळगाव

रामदुर्ग तालुक्मयातील बिजगुप्पी गावामध्ये उभारण्यात आलेल्या विश्वगुरू महामानव, जगज्योती बसवेश्वर यांच्या पुतळय़ाची विटंबना करण्यात आली. त्यामुळे समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. या घटनेने काळी काळ तणाव निर्माण झाला होता. काही अज्ञात समाजकंटकांनी हे काम केले असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी गुरुदत्त सेवा संघ वीरशैव लिंगायत पंचमसाली समाजातर्फे जिल्हाधिकाऱयांकडे व बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वारंवार महामानवांच्या पुतळय़ांची विटंबना होत असते. जिह्यात असे प्रकार वाढत आहेत. समाजात वितुष्ट निर्माण करण्यासाठी काही समाजकंटक असे  हीन कृत्य करत आहेत. त्यांना योग्य तो धडा शिकविणे गरजेचे आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

जगज्योती बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, राणी कित्तूर चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा यांनी दिलेले योगदान कधीच विसरण्याजोगे नाही. तेव्हा अशा महामानवांच्या पुतळय़ांची विटंबना बऱयाच वेळा होत असते. त्यामुळे अनेक वेळा हाणामारीचे प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी जातीय दंगलीही उसळल्या आहेत. त्यामुळे अशा समाज कंटकांवर कारवाई होणे गरजेचे आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

कर्नाटकात पेट्रोल, डिझेलवरील कर 7 रुपयांनी स्वस्त

Archana Banage

तलावाचे अस्तित्व राखण्यासाठी प्रशासनाने लावला फलक

Omkar B

24 तासात केवळ 3 नवे रुग्ण बेंगळूरमध्ये गर्भवतीचा मृत्यू

Tousif Mujawar

• भाजी विक्री केंद्र सुरू…. ग्राहकांचा अल्पप्रतिसाद

Patil_p

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर येऊ नये

Patil_p

लोकमान्य ग्रंथालयातर्फे टिळक पुण्यतिथीचे आचरण

Patil_p