कुरुंदवाड / प्रतिनिधी
कृतिका नक्षत्रावर आलेल्या त्रिपुरारी अर्थात कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर घाट परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त येथील दत्त मंदिर घाटावरील परिसरात लक्ष दिव्यांनी उजळला याचे प्रतिबिंब कृष्णा नदीत पडल्यामुळे हा परिसर अत्यंत विलोभनीय दिसत होता.
8 महिन्याच्या दत्त दर्शन बंद नंतर प्रथमच कार्तिक पौर्णिमेला येथील दत्त मंदिर संपूर्ण दिवस-रात्र दर्शनासाठी खुले ठेवले होते. यामुळे हजारो भाविकांनी आज सोशल डिस्टंसिंग तसेच सर्व नियमांचे पालन करून दत्त चंद्र लाभ घेतला.
कार्तिक पौर्णिमेनिमित्त पहाटे पाच वाजता प्रातःकालीन पूजा, दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या मुख्य चरणकमलांची महापूजा, दुपारी तीन ते चार पवमान पंचसूक्त पठण रात्री उशिरा धूप-दीप आरती पालखी सोहळा आधी नित्य कार्यक्रम पार पडले.
सध्या दिवस लहान असल्याने लवकरच अंधार पडतोय यामुळे सायंकाळी सहा वाजल्यापासूनच दत्तमंदिर घाट परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शेकडो भक्त दिव्याच्या पणत्या घेऊन दीपप्रज्वलन करत होते. दक्षिण उत्तर विस्तीर्ण घाटावर शेकडो दिव्यांनी हा परिसर चांगलाच उजळून निघाला.
मुख्य मंदिरात रात्री साडेआठ वाजता धूप आरती झाल्यानंतर इंची उत्सव मूर्ती नारायण स्वामी मंदिरातून दिगंबरा दिगंबरा च्या गजरात मुख्य मंदिरात आणण्यात आलेल्या नंतर आरती होऊन श्रींचा पालखी सोहळा सुरू झाला. यावेळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पालखी पाहण्यासाठी व पालखी दाखवा साठी शेकडो भाविकांनी दत्त मंदिर घाट परिसर फुलून गेला होता.
दत्त मंदिराच्या उत्तर-दक्षिण घाटावर रात्री उशिरापर्यंत परिसरासह सांगली कोल्हापूर विसर्जन येथून आलेले शेकडो भाविक दीपप्रज्वलन करत होते. दिव्याची अर्थात त्रिपुरी पौर्णिमा असल्यामुळे दिवे पणत्या विकण्यासाठी वेळोवेळी स्टॉल मंदिर मार्गावर लावण्यात आले होते.
आज सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे दत्त मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी दर्शनासाठी रांग लागली होती. दत्त देवस्थान मार्फत मुख्य दर्शन, मुखदर्शन अशा विविध प्रकारच्या रांगा करण्यात आल्या होत्या. यासाठी दत्तदेव संस्थांचे कर्मचारी तसेच स्वयंसेवक दर्शन रांगेवर जातीने लक्ष ठेवून होते. लॉकडाऊननंतर प्रथमच मंदिर उघडल्याने पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनाचा व दीप प्रकरणाचा लाभ घेतला.


previous post