Tarun Bharat

‘त्रिसदस्यीय’मुळे 16 प्रभाग फुटणार; विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांना फटका

92 पैकी 59 प्रभाग होणार आरक्षित

कोल्हापूर / विनोद सावंत

महापालिकेच्या निवडणूकीमध्ये त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे जुन्या 81 पैकी 16 प्रभाग फुटणार असल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांना फटका बसणार आहे. यामध्ये काही नवख्यांचा पत्ता कट होणार असून अनेक वर्षापासून एकाच प्रभागात ठाण मांडून असणाऱयांचाही प्रवास खडतर होणार आहे.

कोल्हापूर महापालिकेची आतापर्यंत एक सदस्यीय प्रभाग रचना होती. यामुळे मर्यादीत क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केल्यास निवडणूकीमध्ये यश मिळत होते. यावेळी प्रथमच राज्य शासनाने कोल्हापूर महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय म्हणजेच त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रारूप प्रभाग रचनाही तयार झाली असून उद्या, मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. यापूर्वी साडेपाच ते साडेसहा हजाराचा एक प्रभाग होता. त्रिसदस्यीमुळे 16 हजार 200 ते 17 हजार 900 पर्यंत एक वॉर्ड असणार आहे. यानुसार जुने दोन पूर्ण प्रभाग आणि एक प्रभागातील निम्म्या परिसराचा समावेश आहे. यामुळे जुने 16 प्रभाग दोन वॉर्डमध्ये फुटणार आहेत. एक सदस्यीय प्रभाग रचना डोळय़ासमोर ठेवून ज्यांनी या प्रभागामध्ये फिल्डींग लावली होती. त्यांचा पत्ता कट होणार आहे. यामध्ये 16 विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचा समावेश असणार आहे.

प्रस्थापितांना संधी, नवख्यांची दमछाक
शहरातील 10 ते 15 घराणी अशी आहेत की ती नेहमी सभागृहात असतात. प्रभाग आरक्षित झाला तरी ते शेजारील प्रभागातून निवडून येतात. अशा प्रस्थापितांचे परिसरातील दोन ते तीन प्रभागात संपर्क असतो. त्यांना त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत काही अंशी संधी आहे. नवख्याची मात्र, संपर्क नसलेल्या परिसरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी दमछाक होणार आहे. शिवाय तीन प्रभागात प्रचारासाठी ‘खिसा’ रिकामा करावा लागणार आहे.

वाढीव 11 सदस्यांचा फायदा कोणाला?
शहरासह उपनरातील वाढलेल्या मतदार संख्येमुळे 81 वरून 92 सदस्य झाले आहेत. सभागृहात 11 नगरसेवक वाढणार आहेत. याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार याकडेही लक्ष लागून आहे.

92 पैकी 33 प्रभाग खुले
राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षण वगळून निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. सध्याच्या घडीला 92 पैकी 59 प्रभाग आरक्षित असणार आहेत. यानुसार अनुसूचित जातीसाठी 12 सदस्य, महिला 46 आणि अनुसूचित जातीचा 1 सदस्य असणार आहे. तर 33 प्रभाग खुले असणार आहेत. ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यास यामध्ये ओबीसीच्या 27 टक्के जागा आरक्षित होतील.

दोन वॉर्डबाबत उत्स्कुता शिगेला
शहारतील प्रत्येक वॉर्डमध्ये प्रभाग रचनेबाबत उत्स्कुता आहे. विशेष करून 31 पैकी 2 वॉर्डमध्ये सर्वाधिक उत्स्कुता आहे. हे वॉर्ड केवळ दोन सदस्यीय असणार आहेत. यामध्ये जुने दोन प्रभागाचा समावेश असणार आहे. मात्र, दोन वॉर्ड कोणते असणार, दोन वॉर्डची लॉटरी कोणाला लागणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे.

अशी असणार प्रभाग रचना
एकूण वॉर्ड -31
एकूण सदस्य-92
प्रत्येकी तीन सदस्याचे वॉर्ड-30
दोन सदस्याचे वॉर्ड-1
सरासरी मतदार -17 हजार 910

Related Stories

मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील-संभाजीराजे

Archana Banage

Nashik; नाशिकच्या शास्त्रार्थ सभेत रंगले मानापमान नाट्य

Abhijeet Khandekar

क्विंटन डी कॉकने या कारणासाठी सामना सोडला

Archana Banage

इंडोनेशियात भूकंपाचे धक्के

datta jadhav

चंद्रपूर, अमरावती, वर्धा जिल्ह्यात पूरस्थिती; ट्रक आणि प्रवासी गाडी पुरात गेली वाहून

Archana Banage

सांगली : साहेब, वाहतूक पोलिसांकडून होणारी लुट थांबवा

Archana Banage