Tarun Bharat

त्वचेतील पेशीचा वापर कोरोनावरील उपचारावर शक्य

कॅलिफोर्निया

 कोरोनाचे रुग्ण वाढत असताना संशोधक मात्र आपल्या नव्या संशोधनाला धार चढवत असताना दिसले आहेत. अमेरिकेतील संशोधकांनी त्वचेतील पेशींद्वारे कोरोना रुग्णावर केलेले उपचार फलदायी ठरले असल्याचे दिसले आहे.

 सीडार्स सीनई वैद्यकीय केंद्र, कॅलिफोर्निया येथील संशोधकांनी त्वचेतील पेशींचा वापर कोरोनाशी लढण्यासाठी यशस्वीपणे करता येऊ शकतो अशा प्रकारचा शोध लावला आहे. कोरोनाच्या उपचारासाठी त्वचेतील पेशींचा वापर करणे शक्मय असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. कोविड-19 उपचारासाठी त्वचेतील पेशींचा वापर उपयुक्त ठरतो आहे. मानवी शरीरातील फुप्फुसातील पेशी कोरोना बाधित रुग्णांमध्ये सोडल्या असता कोरोनाबाधीत रुग्णाची परिस्थिती सुधारत असल्याचे तपासातून पुढे आले आहे. दुसऱया व्यक्तिच्या त्वचेतील पेशी कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडल्यावर बाधीत भागामध्ये सुधारणा होत आहेत. यावर अद्याप सविस्तर अध्ययन होणे बाकी असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. ही नवी उपचारप्रणाली कोरोनाच्या या महाभयंकर काळात उपयुक्त ठरणारी असेल, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

Related Stories

आदिमानव विलुप्त होण्याचे मिळाले कारण

Patil_p

म्हणून साजरा करतात ‘कारगिल विजय दिवस’

Rohit Salunke

केंद्राने गव्हाच्या निर्यातीवरील निर्बंधावर आणली शिथिलता

Abhijeet Khandekar

अल साल्वाडोरमध्ये पहिली बिटकॉइन सिटी

Patil_p

अंतराळवीराचा वयाच्या 93 व्या वर्षी चौथा विवाह

Patil_p

हा माणूस सत्तेवर राहू शकत नाही!

Patil_p