Tarun Bharat

थंडीचा जोर वाढल्याने स्वेटर खरेदीसाठी गर्दी

विचित्र वातावरणाचा कराडकरांना येतोय अनुभव

वार्ताहर / कराड

आठवडाभरापासुन ऊन-पाऊस, थंडी व ढगाळ वातावरण अशा विचित्र वातावरणाचा कराडकरांना अनुभव येत आहे. अशातच शनिवारी दिवसभर जोरदार वारे वहात असल्याने कराड शहर व परिसरात थंडीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने रविवारी बाजारपेठेत स्वेटर, कानटोपी आदी प्रकारचे गरम कपडे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.

आठवडय़ाच्या सुरवातीला दोन दिवस कडाक्याची थंडी पडली होती. यानंतर मात्र सलग चार दिवस ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊसही झाला. शनिवारी मात्र सकाळपासूनच शहरासह तालुक्यात जोरदार वारे वाहात होते. यामुळे दिवसभर थंडी जाणवत होती. तर रविवारी पहाटेही थंडीत वाढ झाल्याचे पहावयास मिळाले. रविवारी दिवसभर मात्र ढगाळ वातावरण होते. असे विचित्र वातावरण असल्याने नागरिकांच्यात आरोग्याच्या तक्रारीतही वाढ झाली आहे.

रविवारी कराडचा आठवडी बाजार होता. त्यातच थंडीत वाढ झाल्याने स्वेटर, कानटोपी, हातमोजे, आदी प्रकारचे गरम कपडे खरेदीसाठी लोकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. कापड दुकानांबरोबरच रस्त्यावरही स्वेटर विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

Related Stories

बाधितवाढ चारशे-पाचशेवर स्थिर

datta jadhav

जम्बो हॉस्पिटल कि पर्यंटन सेंटर

Patil_p

महाराष्ट्र केसरी लढतीसाठी भगत, जाधव यांची निवड

Patil_p

छ.उदयनराजेंनी केली ऐतिहासिक गोलबाग विकास कामाची पाहणी

Archana Banage

हद्दवाढ निधीसाठी जिल्हा परिषदेला पत्र

Patil_p

लसवंत असाल तरच शासकीय कार्यालयात या

Patil_p