Tarun Bharat

थकबाकीदारांचे होणार पाणी कनेक्शन कट

प्रतिनिधी/ गोडोली

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ कनेक्शन असलेले अनेक ग्राहक पाणी बिलाचे थकबाकीदार आहेत. यात बडय़ा धेंडय़ाचा समावेश असून फेब्रुवारी अखेर पर्यंत थकबाकी पाणी बील भरले नाही तर 1 मार्चपासून संबंधितांचे कनेक्शन कायमस्वरूपी बंद केले जाणार आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार  त्यांच्याकडील थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहा. कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे-चौगले यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

सातारा शहर आणि उपनगरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत लष्कर पाणी पुरवठा केंद्राद्वारे पाणी पुरवठा केला जातो. ग्राहकांना वेळोवेळी निविदेद्वारे जाहीर आवाहन करुन सुध्दा अद्यापही काही थकबाकीदार आहेत. वरिष्ठ कार्यालयाने अशा थकबाकीदारांची नळ कनेक्शन कायमस्वरूपी बंद करून वसूलीसाठी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ग्राहकांची पाणी बिल थकबाकी आहे अशा ग्राहकांनी पाणी बील थकबाकी त्वरित भरण्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. नोटीसेप्रमाणे पाणी बील थकबाकीचा भरणा त्वरित करण्यासाठी दि. 28 फेब्रुवारी ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. थकबाकी न भरणाऱया ग्राहकांचे नळकनेक्शन कायमस्वरूपी खंडीत करण्याची कार्यवाही दि. 1 मार्चपासून सुरू होणार आहे, असे आवाहन जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

‘त्या’ व्हिडिओबद्दल मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या …

Tousif Mujawar

रविवार पेठेतील सैनिकनगर मायक्रो कंटेन्मेंट झोन

Patil_p

यंत्रमाग कामगाराचा मुलगा झाला ‘एअर फोर्स’ मध्ये गरुड कमांडो

Archana Banage

‘हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात पोलिसांना नको ती कामं करावी लागताहेत’

Archana Banage

जिवंत बॉम्बचे स्थानिक कनेक्शन?

Amit Kulkarni

पुन्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी

Patil_p