Tarun Bharat

थकवा दूर करण्यासाठी…

बर्याचजणींना सारखा थकवा येतो. थोडं काम केल्यावर दम लागतो. अगदी गळून गेल्यासारखं वाटतं. आवडीचं काम करताना अतिथकव्यामुळे उत्साह वाटत नाही. ऑफिसमधल्या महत्वाच्या जबाबदारीपासून लांब रहावं लागतं. यामुळे प्रगती खुंटते. थकवा घालवण्यासाठी सततच्या चहा किंवा कॉफीच्या सेवनामुळे तात्पुरता उत्साह वाटत असला तरी त्याचे दुष्परिणाम अधिक आहेत. सतत येणारा थकवा दूर करण्यासाठी करून पहा काही उपाय…..

* सुक्या मेव्याच्या सेवनामुळे ताकद टिकून राहण्यास मदत होते. खूप थकवा आला असेल तर थोडय़ाशा सुक्या मेव्यानेही उत्साही वाटू लागेल.

* केळं हे     उर्जेचा स्त्रोत आहे. यात कार्बोहायड्रेट, नैसर्गिक गोडवा, अमिनो ऍसिड, जीवनसत्त्वं मोठय़ा प्रमाणावर असल्याने त्वरित उर्जा देणारं खाद्य म्हणूनही केळ्याकडे पाहता येतं.

* नाश्त्यामध्ये अंडय़ाचा समावेश असेल तर तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता. अंडं हे प्रथिनं आणि अमिनो ऍसिड यांचा समृध्द स्त्रोत असल्यानं थकवा पळून जातो. * ऍव्हाकॅडो या फळामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते त्यामुळेच हे फळ सुपरफूड श्रेणीमध्ये मोडतं. या फळामध्ये फायबरचं प्रमाणही मोठय़ा प्रमाणावर असल्यानं पचनसंस्था सुदृढ होण्यास मदत होते. 

Related Stories

मास्कचा फॅशन फंडा

Omkar B

कोरोनाच्या कठीण काळात

Amit Kulkarni

कॅन्सर माझा सांगाती

Amit Kulkarni

ट्रेंडी ऑफिस वेअर

Amit Kulkarni

मुकाबला सायबर स्टॉकिंगचा

Amit Kulkarni

लाभ कोहळ्या उन्हाची

Amit Kulkarni
error: Content is protected !!