Tarun Bharat

‘थर्टी फस्ट’च्या पाटर्य़ांवर पोलिसांची नजर

कराडात गस्तपथके वाढवली, पाच ठिकाणी नाकाबंदी

प्रतिनिधी/ कराड

कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने 31 डिसेंबर जल्लोषात साजरा करण्याची तयारी सुरू झाल्याचे दिसते. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करताना आयोजित पाटर्य़ांवर पोलिसांची नजर असणार आहे. यातच ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने पोलिसांनी कारवाईची तयारी केली आहे. कराड शहर परिसरात पाच ठिकाणी नाकाबंदी व वाहनतपासणी होणार आहे. 

गेल्या वर्षात कोरोनाच्या संकटाने कराड तालुक्याला घेरले होते. गेल्या महिनाभरात कराड शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर कमी झाला आहे. रुग्णवाढीचा वेग लक्षणीय कमी झाल्याने घरगुती समारंभ, कार्यक्रमांची रेलचेल वाढली आहे. यातच येत्या गुरुवारी 31 डिसेंबर साजरा होत असून शुक्रवारी नववर्षाचे स्वागत होणार आहे. 31 डिसेंबर साजरा करताना पाटर्य़ांवर पोलिसांची नजर आहे. सोमवारीच जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी हॉटेल, धाबे, परमिट रुम, बीअर बार यांना रात्री 11 नंतर सुरू ठेवण्यास मनाई केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी कराड, मलकापूरसह शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तपथके वाढवली आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. शहर व परिसरात पाच मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करून प्रत्येक वाहन तपासले जाणार आहे. चालकाने मद्य प्राशन केले आहे का? याचीही तपासणी होणार आहे. हुल्लडबाजी, गर्दी करणारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासगी फार्महाऊस, इतर ठिकाणांवरील पाटर्य़ांमधून नियम मोडले जाणार नाहीत याकडे पोलिसांचे लक्ष आहे. 

कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनीही तालुक्यात नाकाबंदी व वाहन तपासणीसाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. ग्रामपंचायत निवडणुका सुरू असून 31 डिसेंबरला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी त्यांनी खबरदारी म्हणून प्रत्येक दूरक्षेत्रातील अधिकारी, पोलीस कर्मचाऱयांना सूचना दिल्या आहेत. 31 डिसेंबर आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.

Related Stories

रविवार पेठेतील सैनिकनगर मायक्रो कंटेन्मेंट झोन

Patil_p

प्रवीण जाधवला आंतराष्ट्रीय दर्जाचा प्रशिक्षक अन् प्रशिक्षण देणार

datta jadhav

लॉकडाऊनची शिथिलता तीन-चार टप्प्यात- विजय वडेट्टीवार

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसात २७० पॉझिटिव्ह, तिघांचा बळी

Archana Banage

गोंदियातील बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; मुख्यमंत्र्यांची माहिती

Archana Banage

कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका : अजित पवार

Tousif Mujawar