Tarun Bharat

थायंलड, सिंगापूरसोबत भारताचा सागरी युद्धाभ्यास

Advertisements

सिटमॅक्स 2020 चे आयोजन : तिन्ही देशांच्या युद्धनौका सामील

वृत्तसंस्था / अंदमान

सिंगापूर आणि थायंलडच्या नौदलांसोबत अंदमान येथील समुद्रात भारतीय नौदल दोन दिवसीय त्रिपक्षीय ‘सिटमॅक्स 2020’ मध्ये भाग घेत आहे. भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी युद्धनौका कोर्वेट, कामोरता आणि ‘करमुख’ युद्धनौका त्रिपक्षीय युद्धाभ्यासाच्या दुसऱया आवृत्तीत भाग घेत असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. हा युद्धाभ्यास सोमवारपर्यंत चालणार आहे.

सागरी अभ्यासादरम्यान तिन्ही देशांचे नौदल शस्त्रास्त्रांचा वापर तसेच पृष्ठभागावरील युद्धाचा सराव करणार आहे. सिटमॅस श्रेणीचा हा युद्धाभ्यास भारतीय नौदल, रिपब्लिक ऑफ सिंगापूर नेव्ही (आरएसएन) आणि रॉयल थाई नेवी (आरटीएन)दरम्यान परस्पर सहकार्य आणि आंतर संचालन क्षमतेच्या विकासाकरता आयोजित करण्यात आले आहे.

या युद्धाभ्यासात आरएसएनकडून ‘दुर्जेय’ श्रेणीचे फ्रिगेट ‘इंटरपिड’ आणि ‘एन्डय़ोलरेन्सू’ श्रेणीची टँक लँडिंग शिप ‘एन्डेवर’ने भाग घेतला आहे. आरटीएनकडून चाओ फ्राया शेणीची ‘काराबुरी’ फ्रिगेट सहभागी झाली आहे.

हा युद्धाभ्यास कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही संपर्काशिवाय, केवळ सागरात आयोजित करण्यात आला आहे. या युद्धाभ्यासाचे लक्ष्य तिन्ही मित्र देशांमध्ये समन्वय, सहकार्य आणि भागीदारीचा विकास करणे आहे.

भारतीय नौदलाकडून आयोजित सिटमॅक्सची पहिली आवृत्ती सप्टेंबर 2019 मध्ये पोर्ट ब्लेअरपासून काही अंतरावर समुद्रात करण्यात आले होते. 2020 च्या या युद्धाभ्यासाचे आयोजन आरएसएनकडून करण्यात आले आहे.

Related Stories

रशियाला मोठे नुकसान, 14 विमाने, 102 रणगाडे नष्ट

Patil_p

“कर्नाटकची कोरोना तांत्रिक सल्लागार समिती नावापुरतीच”

Archana Banage

हिमालयात आलेत नवे अतिथी

Patil_p

बर्फाचे बुडबुडे अन् सर्वात खोल सरोवर

Patil_p

पाकची आगळीक, सैन्याने शिकविला धडा

Patil_p

युक्रेनमध्ये गोळीबारात भारतीय विद्यार्थी जखमी

datta jadhav
error: Content is protected !!