Tarun Bharat

थिसारा परेराचे षटकात 6 षटकार

Advertisements

असा पराक्रम करणारा लंकेचा पहिला फलंदाज

वृत्तसंस्था/ कोलंबो

अष्टपैलू थिसारा परेरा हा एका षटकात सहा षटकार ठोकणारा लंकेचा पहिला फलंदाज बनला आहे. एका व्यावसायिक स्थानिक स्पर्धेत रविवारी त्याने हा पराक्रम केला.

मेजर क्लब्स मर्यादित षटकांच्या लिस्ट ए क्रिकेट स्पर्धेत 31 वर्षीय थिसारा श्रीलंका आर्मी संघाचे नेतृत्व करीत होता. या स्पर्धेतील साखळी सामन्यात ब्लूमफील्ड क्रिकेट अँड ऍथलेटिक क्लबविरुद्ध खेळताना त्याने केवळ 13 चेंडूत नाबाद 52 धावा झोडपल्या. रविवारी या खेळीतच त्याने एका षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. त्याच्या खेळीत एकूण आठ षटकारांचा समावेश होता. लिस्ट ए क्रिकेटमध्ये लंकेतर्फे नेंदवलेले हे दुसऱया क्रमांकाचे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. याआधी लंकेचा माजी अष्टपैलू कौशल्या वीररत्नेने 2005 मध्ये 12 चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवले होते.

परेरा त्यांच्या डावातील 20 चेंडू बाकी असताना पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आला होता. षटके कमी करून हा सामना 41 षटकांचा खेळविण्यात आला होता. पार्ट टाईम ऑफस्पिनर दिलहान कूरेच्या एका षटकात त्याने सलग सहा षटकार मारले. व्यावसायिक क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा थिसारा हा जगभरातील नववा फलंदाज असून याआधी विंडीजचे माजी महान अष्टपैलू सर गारफिल्ड सोबर्स, भारताचे रवि शास्त्री, हर्शल गिब्ज, युवराज सिंग, रॉस व्हिटली, हझरतुल्लाह झझाई, लिओ कार्टर व अलीकडेच कीरन पोलार्ड यांनी अशी कामगिरी केली आहे. परेराने लंकेतर्फे 6 कसोटी, 166 वनडे व 64 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Related Stories

आयर्लंडचे माजी क्रिकेटपटू टोरेन्स कालवश

Patil_p

गरीबाच्या घरातच पैलवान तयार होतो

datta jadhav

साडेतीन वर्षांनी टीम इंडियाने गमावले टेस्ट क्रिकेटमधील अव्वल स्थान

Tousif Mujawar

पीव्ही सिंधू उपांत्य फेरीत पराभूत

Patil_p

हॅकर्सपासून सावध रहा मोबाईल जपून वापरा

Patil_p

लॉन बॉल्स, टेटेमध्ये भारताला ऐतिहासिक सुवर्ण

Patil_p
error: Content is protected !!